'त्या' व्हिडिओमुळे राहुल गांधींना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 07:54 PM2018-06-19T19:54:07+5:302018-06-19T19:54:07+5:30

महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे.

Rahul Gandhi's notice by POCSO (Protection of Children from Sexual Offences Act)on 'that' video | 'त्या' व्हिडिओमुळे राहुल गांधींना नोटीस

'त्या' व्हिडिओमुळे राहुल गांधींना नोटीस

Next

मुंबई - महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे. या घटनेसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरवर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता. या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्या आरोपींवर "पॉक्सो" अंतर्गत अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली आहे. परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले आहे असे बाल हक्क आयोगाकडे आलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

बाल न्याय अधिनियम कायद्यातील "कलम 74" नुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर न करणे जेणेकरून त्यांची ओळख पटू नये असे म्हंटले आहे. राहुल गांधी यांनी यासंबंधीत मुलांचा व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग होत असून तसेच




 "बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा" (पॉक्सो) नुसार या आरोपींन वर गुन्हा दाखल केलेला असतानाही या कायद्यातील "कलम 23" अन्वये अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो प्रसारीत करणे गुन्हा म्हंटले आहे. याही कायद्याचे राहुल गांधी यांच्या कडून उल्लंघन झालेले असल्याने या विषयात स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी यांना महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटीस बजावली आहे.  राहुल गांधी यांना नोटीस बजावल्या मुळे एकच खळबळ माजली असुन, राहुल गांधी यांच्यावर "पॉक्सो" कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Rahul Gandhi's notice by POCSO (Protection of Children from Sexual Offences Act)on 'that' video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.