शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 20:56 IST

14 दिवसांपूर्वी नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली भारत जोडो यात्रा जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.

औरंगाबाद:काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात असून, आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, यात्रेचा शेवटचा दिवस असूनही राहुल गांधी उद्या महाराष्ट्रातच असणार आहेत. राहुल गांधी उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत.

14 दिवसांपूर्वी नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. दरम्यान, यात्रा सोडून राहुल गांधी उद्या(दि.21) हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. यानंतर ते औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे, त्यानंतर ते विमानाने पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील आणि भारत जोडो यात्रेचा पुढचा प्रवास सुरू करतील. 

औरंगाबादेत आल्यानंतर शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. 'राहुल गांधी उद्या औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असं आवाहन औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादJalgaonजळगाव