राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे अन्...; आमदार लोणीकरांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 20:07 IST2022-11-18T20:06:41+5:302022-11-18T20:07:56+5:30
लोणीकर म्हणाले, "काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी आणि माजी पंतप्रधानांचा मुलगा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढं घाणेरडं बोलू कसं शकतो? यांच्या डोक्यावर तर परिणाम तर झालेला नाही?"

राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे अन्...; आमदार लोणीकरांचा हल्लाबोल
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. ठीक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राहुल गांधीवर तीव्र शब्दात हल्लाबोल करत, जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे आणि यांची मस्ती आणि माज उतरवला पाहिजे, असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाष्य करताना लोणीकर म्हणाले, "काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी आणि माजी पंतप्रधानांचा मुलगा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढं घाणेरडं बोलू कसं शकतो? यांच्या डोक्यावर तर परिणाम तर झालेला नाही? यांनी काही नशा तर केलेली नाही? वारंवार जाणीवपूर्वीक महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत, सावरकरांच्या पावन भूमीत, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमित येऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? यांचा मेंदू सडला आहे का? जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे आणि यांची मस्ती आणि माज उतरवला पाहिजे.
मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आहे, की यांना समाजात दुही निर्माण करायची आहे. यांना राजकारण करायचे आहे आणि जाणीवपूर्वक हा घोडमुंजा ५० वर्षांचा या घोडमुंडाचे लग्नही झालेले नाही. म्हातारा झाला. पण अशा पद्धतीने या वयात ज्येष्ठ, श्रेष्ठ असलेल्या या म्हाताऱ्याने बेताल बडबड करू नये. एवढे जोडे मारले त्यांना महाराष्ट्रात, एवढे खेटरं मारले, की त्यांच्या शंभर पिढ्यात एवढे खेटरं कुणी खाल्ले नसतील. एवढे खेटरं आणि जोडे राहुल गांधी यांनी खाल्ले. त्यांना जेलमध्ये डांबणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. त्यांचा अभिमान आम्ही कदापीही सहन करणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय गृहमंत्री यांनी राहुल गांधी यांना जेलमध्ये टाकायलाच हवे, अशी मागणीही लोणीकर यांनी केली आहे.