Rahul Gandhi is called 'Cartoon Network'; Now Aditya Thackeray meet him | राहुल गांधींना म्हणाले होते 'कार्टून नेटवर्क'; आदित्य ठाकरेंनी आता घेतली त्यांचीच भेट

राहुल गांधींना म्हणाले होते 'कार्टून नेटवर्क'; आदित्य ठाकरेंनी आता घेतली त्यांचीच भेट

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मतं देऊन सत्तेत बसविल्यास देशाचं कार्टून नेटवर्क होईल, अशी टीका कधीकाळी शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी त्यांनी ही टीका केली होती. आता त्याच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जावून राहुल गांधी यांची भेट घेतली. 

याआधी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते राहुल यांना भेटले नव्हते. मात्र यावेळी आदित्य यांनी आवर्जुन राहुल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. 

लोकसभा निवडणुकीत आदित्य यांनी राहुल यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यावेळी शिवसेना पक्ष भाजपच्या साथीत निवडणुकीला सामोरे गेला होता. देशातील जनतेने राहुल गांधी यांना मते दिली तर देशात कार्टून नेटवर्क येईल, अशा शब्दांत आदित्य यांनी टीका केली होती. तसेच मोदी पुढील पाच वर्षांत देशाचा विकास घडवून आणतील असंही सांगितले होते. पालघर मतदार संघातील कार्यक्रमात आदित्य यांनी ही टीका केली होती. 
 

Web Title: Rahul Gandhi is called 'Cartoon Network'; Now Aditya Thackeray meet him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.