शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

"आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय"; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:52 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

शेगाव:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज (17 नोव्हेंबर, गुरुवार) 11 वा दिवस आहे. दुपारी एक वाजता त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याचा पुनरुच्चार केला. राहुल गांधी म्हणाले, 'माझ्याकडे सावरकरजींचे पत्र आहे, जे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला लिहिले होते. त्यात त्यांनी इंग्रजांना सेवक होण्याची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि मोहन भागवत यांनी हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती,' असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

संबंधित बातमी- अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली आणि त्यांच्याकडून पेन्शन घेतली, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. विशेष म्हणजे, कालच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या विचारांना जमिनीखाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली होती. यावर राहुल गांधी म्हणाले की, हिम्मत असेल तर आमची यात्रा थांबवून दाखवा. 

'गांधी, नेहरू, पटेल झुकले नाहीत'पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, 'या पत्रावर सावरकरजींनी सही केली होती. गांधीजी, नेहरूजी आणि पटेलजीही तुरुंगात होते, अशा पत्रावर कोणीही सही केली नव्हती,' असंही राहुल म्हणाले. तसेच, 'या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे, असे त्यांना वाटत असेल तर यात्रा थांबवून दाखवावी. आमच्या राजकारणात आणि भाजपच्या राजकारणात हाच फरक आहे. भाजप दबाव टाकत आहे, आम्ही हुकूमशाही मानत नाही,' अशी टीकाही राहुल यांनी केली. 

'भाजप हुकूमशाही पद्धतीने काम करेत'राहुल पुढे म्हणाले की, 'आम्ही भारत जोडो यात्रा कोणत्याही स्वार्थासाठी करत नाही आहोत. आम्ही सप्टेंबरमध्ये हा प्रवास सुरू केला, या प्रवासात आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर जाणार आहोत. यामागे आमचा निवडणूक जिंकण्याचा किंवा इतर काही हेतू नाही. भाजपचे राजकारण द्वेष, भीती आणि हिंसेने भरलेले आहे. याविरोधात आमची भारत जोडो यात्रा आहे. या यात्रेची गरज नसती, तर लाखो लोक  यात्रेत सहभागी झाले नसते,' असंही राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा