राधे माँकडून गुरुद्वारात प्रार्थना

By Admin | Published: August 9, 2015 02:33 AM2015-08-09T02:33:23+5:302015-08-09T02:33:23+5:30

मुंबईतील वादग्रस्त ‘राधे माँ’ने शनिवारी सकाळी येथे गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दिवसभर ध्यानधारणा केली, असे त्यांच्या भक्तांनी सांगितले. रात्री उशिरा त्या हैदराबादमार्गे

Radhe mother prayer at Gurdwara | राधे माँकडून गुरुद्वारात प्रार्थना

राधे माँकडून गुरुद्वारात प्रार्थना

googlenewsNext

नांदेड : मुंबईतील वादग्रस्त ‘राधे माँ’ने शनिवारी सकाळी येथे गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दिवसभर ध्यानधारणा केली, असे त्यांच्या भक्तांनी सांगितले. रात्री उशिरा त्या हैदराबादमार्गे दिल्लीला रवाना झाल्याचे समजते.
राधे माँ यांचे येथे सकाळी ६.३० वाजता आलिशान कारने आगमन झाले. त्यांच्यासोबत तब्बल सहा इनोव्हा कारमध्ये भक्त आले होते. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा लवाजमाही त्यांच्यापाठोपाठ शहरात दाखल झाला. राधे माँ यांनी सकाळीच भक्तांसह गुरुद्वारा येथे जाऊन अरदास (प्रार्थना) केली. त्यानंतर दिवसभर त्या निवासाची व्यवस्था केलेल्या हॉटेलवर होत्या. दिवसभरात अनेकांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ध्यान करीत असल्याचे त्यांच्या भक्तांनी सांगितले. मुंबईत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर शुक्रवारी औरंगाबादमध्ये त्यांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तास चौकशी केली होती. (प्रतिनिधी)

पोलीस सूत्रांनी सांगितले, राधे माँ यांना अटक करणे किंवा त्यांची चौकशी करण्याची कोणतीही सूचना मिळालेली नाही. मुंबईहून अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याशी संबंधित बातम्या देण्यासाठी त्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे पोलीस केवळ त्याकडे लक्ष ठेवून आहेत.
गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर राधे माँ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. जे काही चाललेले आहे ते ईश्वर बघेल.

Web Title: Radhe mother prayer at Gurdwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.