शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राधे माँ म्हणते, ‘मी निर्दोष’..!

By admin | Updated: August 11, 2015 02:08 IST

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आध्यात्मिक गुरू राधे माँ उर्फ सुखविंदर कौर हिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मुंबई : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आध्यात्मिक गुरू राधे माँ उर्फ सुखविंदर कौर हिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण निर्दोष असल्याचे सांगताना तिने प्रसारमाध्यमे आणि पोलिसांकडून आपला छळ होत असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला.राधे माँच्या चौकशीसंदर्भात पोलिसांकडून प्रश्नावली तयार केली जात आहे. येत्या शुक्रवारी कांदिवली पोलीस ठाण्यात तिची चौकशी करण्यात येईल. रविवारी रात्री त्याबाबतचे समन्स तिला बजावण्यात आले आहे. कांदिवलीत राहत असलेल्या एका विवाहितेने १५ दिवसांपूर्वी छळाप्रकरणी सासरच्या मंडळीसह राधे माँविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राधे माँबद्दलचे अनेक किस्से, वादग्रस्त क्लीप आणि छायचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर राधे माँ हिने सोमवारी वाळकेश्वर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. ती म्हणाली, मी माझ्या सर्व भक्तांवर प्रेम करते, कोणालाही दुखावत नाही, त्यामुळे कौटुंबिक कारणास्तव कोणाही तरुणीला छळण्याचे कृत्य आपल्याकडून कधीही झालेले नाही. माझा प्रसारमाध्यमे आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. मी त्यांचा आदर करते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही घटकांकडून माझा जाणीवपूर्वक छळ केला जात आहे. मात्र चौकशीअंती सत्य समोर येईल, तोपर्यंत माध्यमांनी संयम बाळगावा. (प्रतिनिधी)भक्त मला श्रेय देतातस्वत:ला दुर्गादेवीचा अवतार समजणाऱ्या राधे मॉँला त्याबाबत विचारणा केली असता, ती म्हणाली, माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी मी प्रार्थना करते, देव त्यांची इच्छापूर्ती करतो. मात्र भक्त त्याचे श्रेय मला देतात, हे भक्तांचे आपल्यावरील प्रेम आहे, असे मी मानते.