महाविकास आघाडीचा इरादा पक्का; नगरमध्ये विखे-पाटलांना 'दे धक्का'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:59 IST2020-01-01T05:09:17+5:302020-01-01T06:59:46+5:30
राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न नगर जिल्हा परिषदेतही यशस्वी

महाविकास आघाडीचा इरादा पक्का; नगरमध्ये विखे-पाटलांना 'दे धक्का'
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न नगर जिल्हा परिषदेतही यशस्वी झाला़ माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे तसेच शिवाजी कर्डिले यांना जोरदार झटका देत राष्ट्रवादीच्या राजश्री घुले अध्यक्षपदी तरी काँगे्रसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदी विराजमान झाले. निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतली़ त्यामुळे घुले, शेळके यांच्या बिनविरोध निवडी झाल्या.
राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना, शेतकरी क्रांतीकारी पक्ष यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळविण्याचा चंग बांधला़ महाविकास आघाडीकडे ५० पेक्षा जास्त संख्याबळ झाले. तसेच काँग्रेसमधील विखे गटही कोंडीत पकडण्यात महाविकास आघाडीला यश आले. १३ सदस्यांच्या जोरावर भाजप निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती.
चार सदस्य अनुपस्थित
जिल्हा परिषदेत काँगे्रसचे २३, राष्ट्रवादीचे १९, भाजपचे १४, शिवसेनेचे ७, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे ५, महाआघाडीचे २, कम्युनिष्ट १, शेतकरी विकास मंडळ १, जनशक्ती १ असे ७३ सदस्य आहेत़ भाजपचे डॉ़ किरण लहामटे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले आहेत़ त्यामुळे भाजपचे संख्याबळ एकने घटून १३ वर आले़ त्यात पुन्हा चार सदस्य अनुपस्थित राहिले़