शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 16:23 IST

Gurudas Kamat Death: काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई - काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.कामत यांच्या आकस्मिक निधनामुळे मोठा धक्का बसल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. गुरूदास कामत यांचा संघटनात्मक अनुभव दांडगा होता. कार्यकर्त्यांसाठी ते एक आधारस्तंभ होते. त्यांची नाळ थेट सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जुळलेली असल्याने ते एक लोकप्रिय नेते होते व त्यामुळेच तब्बल पाच वेळा त्यांना लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारमध्ये अनेक खात्यांचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षाला अधिक संघटनात्मक बळकटी दिली. सध्याच्या संघर्षाच्या काळात काँग्रेसला त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाची आणि उत्तम संघटन कौशल्याची अतिशय गरज होती.

परंतु, त्यांनीअचानक ‘एक्झिट’ घेतल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.  कामत यांच्या निधनामुळे वैयक्तिक देखील मोठी हानी झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्या काळापासून कामत यांनी सातत्याने आपल्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांची पोकळी प्रकर्षाने जाणवत राहिल, या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या व दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Gurudas Kamatगुरुदास कामतcongressकाँग्रेसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील