शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर कारागृहात क्विक रिस्पॉन्स टीम

By admin | Updated: July 26, 2015 02:11 IST

दहशतवादी हल्ल्यासह कोणत्याही प्रकारच्या स्थितीला निपटून काढण्यात सक्षम असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमने (क्यूआरटी) कारागृहाचा आतमधील परिसर शनिवारी ताब्यात घेतला.

- नरेश डोंगरे,  नागपूरदहशतवादी हल्ल्यासह कोणत्याही प्रकारच्या स्थितीला निपटून काढण्यात सक्षम असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमने (क्यूआरटी) कारागृहाचा आतमधील परिसर शनिवारी ताब्यात घेतला. नि:शस्त्र आणि सशस्त्र अशा दोन्ही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्याची क्षमता असलेल्या निष्णात जवानांचा त्यात समावेश आहे. ‘आॅपरेशन याकूब’ संपेपर्यंत हे पथक आता कारागृहाच्या आतमध्येच राहणार आहे. राज्यपालांकडे दयेचा अर्ज आणि सर्वोच्च न्यायालयात डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचे सांगणारी याचिका दाखल करून याकूब मेमनने फाशी टाळण्यासाठी धडपड चालवली आहे. फाशी प्रकरणाचे राजकारण केले जात असल्यामुळे देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. दुसरीकडे याकूबला फासावर चढविण्यासाठी कारागृह प्रशासनाने तयारी केली आहे. याकूबच्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून कारागृहात माओवाद्यांनी अन्न घेण्यास नकार देऊन उपोषण केले आहे. ही एकूणच विसंगत स्थिती असताना याकूबला फाशी देण्यापूर्वी किंवा फाशी दिल्यानंतर ‘गडबड’ होऊ शकते, असा ‘अलर्ट’ गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सायंकाळी शहर पोलीस दलाची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) कारागृहात दाखल झाली. १० जणांचे हे पथक अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. दहशतवादी हल्ल्यासारखी किंवा तशीच कोणतीही स्थिती ऐनवेळी निर्माण झाली तर ती निपटून काढण्यात हे पथक सक्षम असते. शनिवारी सायंकाळी मध्यवर्ती कारागृहाच्या आतमधील परिसरात क्यूआरटी तैनात करण्यात आली. याकूब प्रकरणाचा ‘निकाल’ लागेपर्यंत रात्रंदिवस हे पथक कार्यरत राहील. कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ ते तैनात असेल.