शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इतरांना मोठेपण देणे हाच संघटनेचा गुण

By admin | Updated: October 16, 2015 03:46 IST

आपल्यापेक्षा इतरांना मोठे होऊ न देणे हे राजकारणात चालते पण निरलस सेवाभावाने कार्यरत असलेल्या संघटनेत कार्य करणाऱ्यांमध्ये मात्र इतरांना मोठे करण्याचा गुण असतो

मुंबई : आपल्यापेक्षा इतरांना मोठे होऊ न देणे हे राजकारणात चालते पण निरलस सेवाभावाने कार्यरत असलेल्या संघटनेत कार्य करणाऱ्यांमध्ये मात्र इतरांना मोठे करण्याचा गुण असतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युरॉलॉजिस्ट दिवंगत डॉ. अजित फडके यांच्या जीवनावर लिहिलेल्या, ‘अ‍ॅन अमेजिंग ग्रेस’ आणि ‘चंद्रमे जे अलांछन’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ.भागवत यांच्या हस्ते वांद्रे येथील माणिक सभागृहात झाले. ‘आपल्या सोबत काम करणारे लोक आपल्यापेक्षा जास्त उंचीवर गेले पाहिजेत, हा संघटनेचा गुण डॉ. फडके यांच्या ठायी होता, असे सरसंघचालक म्हणाले. ‘मनुष्यत्वाची परीक्षा प्रत्येक मनुष्याला द्यावी लागते. ती मूल्यांची जपणूक करून उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते. यशासाठी मूल्ये सोडावी लागली हे समर्थन अयोग्य आहे. यशस्वी होणे हा गुन्हा नाही पण त्याला मूल्यांची जोड आवश्यक आहे. डॉ.फडकेक़हे मूल्य जपणारे असेच यशस्वी पुरुष होते, असे सरसंघचालक म्हणाले. डॉ. फडके यांच्या ठायी असलेली प्रचंड विद्वत्ता आणि कीर्तीचा दबाव समोरच्यावर कधीही येत नसे. ते सर्वांशीच सहज वागत असत. वैद्यकीय शिक्षणामध्ये मूल्यशिक्षण कधी यायचे ते येईल पण डॉ. फडकेंसारख्यांच्या जीवनचरित्रातून हे शिक्षण आपसुकच मिळते, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी डॉ.फडके यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात डॉ.प्रफुल्ल देसाई, डॉ.संजय ओक, औरंगाबादचे डॉ.अनंत पंधारे, लातूरचे डॉ.अशोकराव कुकडे, डॉ.हर्षद पुंजानी, राजश्री बिर्ला यांचा समावेश होता. डॉ.अचला जोशी, डॉ.राजेंद्र फडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)