सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असलेल्या दाम्पत्याचा कार अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 00:10 IST2021-02-24T22:52:08+5:302021-02-25T00:10:47+5:30
कल्याण- विशाखापटनम नॅशनल हायवेवर तिंतरवणी नजीक भीषण अपघात पती जागीच ठार

सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक असलेल्या दाम्पत्याचा कार अपघातात मृत्यू
महागाव(यवतमाळ) : कल्याण- विशाखापटनम नॅशनल हायवेवर तिंतरवणी नजीक भीषण अपघात पती जागीच ठार तर पत्नी बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.
जखमी महिलेला हायवे ट्राफिक पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले. मात्र तिचाही मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की कार नाल्यात आदळली.
अपघातामध्ये विलास तगडपलेवार , ममता तगडपलेवार हे दांपत्य ठार झाले. ते बुधवारी पुण्यावरून यवतमाळकडे येत होते अशी माहिती आहे. ते ज्या कारमधून येत होते त्या कारला अपघात झाला. चकलांबा पोलिस स्टेशनचे पीएसआय कस्तुरबा व हेड कॉन्स्टेबल सानप घटनास्थळी हजर झाले.
तगडपलेवार हे मूळ मुडाणा (तालुका महागाव) येथील रहिवासी आहेत. ते हल्ली पुसद येथे स्थायिक झाले होते. त्यांचे दोन मुलं पुण्याला स्थायिक झाल्यामुळे त्यांचं नेहमी स्वतःच्या कारणे जाणे-येणे असायचे. त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे पुसद, महागाव परिसरातील नातेवाईक,आप्तेष्ट यांना एकच धक्का बसला.