पुनीत इस्सार यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 20:08 IST2019-11-13T20:07:59+5:302019-11-13T20:08:19+5:30

स्व: लिखित, दिग्दर्शित व अभिनित ‘महाभारत - दी इपिक टेल’ या महानाट्याला आमंत्रित करण्यासाठी, त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Puneet Issar meets RSS chief Mohan Bhagwat | पुनीत इस्सार यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

पुनीत इस्सार यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

तीन दशकापूर्वी गाजलेल्या भव्य अशा महाभारत या पौराणिक मालिकेत गाजलेली दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक पुनित इस्सर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. 

स्व: लिखित, दिग्दर्शित व अभिनित ‘महाभारत - दी इपिक टेल’ या महानाट्याला आमंत्रित करण्यासाठी, त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. या महानाट्याचे दोन प्रयोग नागपुरात होत आहेत. त्याअनुषंगाने, इस्सर यांनी आग्रहाचे आमंत्रण म्हणून सरसंघचालकांशी भेट घेतली. 

यावेळी, नाट्य, मालिका आणि चित्रपटांतून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन कशा तºहेने केले जाऊ शकते, या विषयावरही दोघांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही ‘ताश्कंद फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती,  अभिनेता व खासदार सनी देओल यांनीही संघ मुख्यालयाला भेट दिली होती.

Web Title: Puneet Issar meets RSS chief Mohan Bhagwat