शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 20:42 IST

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागला. या प्रकरणाने सध्या चांगलाच जोर पकडला आहे. याप्रकरणी आरोपी 'बाळा'सह त्याचे वडील आणि आजोबांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर व्हायरल झालेल्या आरोपीच्या व्हिडिओबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

तो व्हिडिओ आरोपीचा नाहीच...अपघाताच्या घटनेनंतर गुरुवारी (23 मे) अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एक रॅप साँग गात असल्याचे दिसले. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. झालेल्या घटनेचा आरोपीला थोडाही पश्चाताप नसल्याचे अनेकांनी म्हटले. काही इलेक्ट्रनिक माध्यमांनीही हा व्हिडिओ सर्वत्र दाखवला. पण, आता तो व्हिडिओ आरोपी तरुणाचा नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याने समोर येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचे नाव आर्यन नीखरा आहे. तो दिल्लीतील रहिवासी असून, सोशल मीडियावर कंटेट क्रिएट करतो. पुण्यातील घटनेतून आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी त्याने घटनेबाबत रॅप व्हिडिओ तयार केला होता. प्रकरण वाढत असल्याचे पाहून अखेर त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले. आर्यन नीखराने इन्स्टा स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये त्याने फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवल्याचे सांगितले. तसेच, त्याने फेक न्यूज देणाऱ्या माध्यमांवर ताशेरेही ओढले. 

'बाळा' च्या वडिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीयाप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला 4 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले होते. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर विशालला सत्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ती संपल्याने पुन्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आज सत्र न्यायालयाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातAccidentअपघातPuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया