शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात फडकल्या महाराष्ट्राच्या ‘चित्रपताका’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 17:40 IST

कुंभ मधील वातावरण,सांस्कृतिक  महत्व, कुंभ विषयीच्या आख्यायिका, आखाडे साधु- महंत या अनुभूतीवर आधारित प्रत्येकी ३ चित्रकृती चित्रकारांनी तयार केली.

पुणे:  प्रयागराज (अहलाबाद) उत्तर प्रदेश गंगा,यमुना व सरस्वती नद्याच्या त्रिवेणी संगमावर ४ मार्चपर्यंत अर्धकुंभ पर्व आयोजित करण्यात आले आहे. तेथील सांस्कृतिक कुंभ या विभागात देशांतील काना कोप-यातून विविध सांस्कृतिक विभागांचे सादरीकरण होत आहे.  सांस्कृतिक कुंभमध्ये राष्ट्रीय ललित कला अकादमी नवी दिल्ली यांनी  विविध राज्याच्या चित्रकार्य शाळा आयोजित केल्या आहेत. या चित्रकार्यशाळेच्या प्रारंभाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून, कुंभमेळ्यात महाराष्ट्राच्या चित्रपताका फडकल्या आहेत.दर १२ वर्षांनी पवित्र कुंभ भरतो तर दर ६ वर्षांनी अर्धकुंभ भरते. यंदा प्रयागराज येथे हे अर्धकुंभ भरविण्यात आले असून, सांस्कृतिक कुंभ मध्ये आयोजित चित्रकार्यशाळेत महाराष्ट्रतील तरुण,अनुभवी व्यावसायिक  १० चित्रकारांचा सहभाग  होता. चित्रकार  रामचंद्र खरटमल, विजयकुमार धुमाळ, अजय देशपांडे, विनायक पोतदार, ओंकार पवार, दिग्विजय कुमार, मंदार उजाळ, संजय नोरा, नागेश टोके, रामदास लोभी, या सर्व चित्रकारांनी त्रिवेणी संगमावरील सांस्कृतिक कुंभ येथे चित्रकलेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले. कुंभ मधील वातावरण,सांस्कृतिक  महत्व, कुंभ विषयीच्या आख्यायिका, आखाडे साधु- महंत या अनुभूतीवर आधारित प्रत्येकी ३ चित्रकृती चित्रकारांनी तयार केली. त्यांच बरोबर साधु- महंतांना समोर बसवून प्रत्यक्ष रेखाचित्रे सादर केली. या सर्व चित्रांचे प्रदर्शन सांस्कृतिक  कुंभ प्रयागराज येथे दि.४ मार्च पर्यंत सर्वांना पाहाण्यासाठी खुले राहणार आहे. 

ललित कलेच्या अशा उपक्रमामुळे विविध राज्यांच्या कलात्मक संस्कृतीची देवाण-घेवाण होण्याच्या उद्देशाने  व्यक्तिचित्रण, चित्र चित्रण कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यशाळेचे मार्गदर्शक संचालक उत्तम पाचरणे (ललित कला अकादमी, नवी दिल्ली) यांनी सांगितले. तर कार्यशाळेचे संयोजन काम प्रा. रमेश भोसले यांनी पाहिले.

 

टॅग्स :PuneपुणेKumbh Melaकुंभ मेळाpaintingचित्रकला