शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

लोंढे रोखण्यासाठी तरतूद

By admin | Updated: March 30, 2015 04:30 IST

राज्याच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बृहन्मुंबईतील लोंढे रोखण्याकरिता आर्थिक तरतूद केली आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेवर कुरघोडी करण्याकरिता भाजपाने

मुंबई : राज्याच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बृहन्मुंबईतील लोंढे रोखण्याकरिता आर्थिक तरतूद केली आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेवर कुरघोडी करण्याकरिता भाजपाने केलेल्या या खेळीवरून भाजपाला लक्ष्य करण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पार्टीने दिला आहे.वित्तमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात याचा कुठेही उल्लेख नव्हता. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर हा विषय काढला म्हणून ही गोष्ट उजेडात आली. सभागृहात बोलताना शेलार यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या विषयपत्रिकेत कार्यासन क्र. २९ (अ)मध्ये बृहन्मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना रोखण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना या शीर्षकाखाली आर्थिक तरतूद केली असल्याचा उल्लेख केला.ही तरतूद कशासाठी केली आहे, यापूर्वी अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही; मग हे सरकार या हेडखाली कोणत्या उपाययोजना करणार आहे, यापूर्वीच्या सरकारने असा कार्यक्रम राबवला होता का, अशी विचारणा शेलार यांनी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात शेलार यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांवर कोणतेही भाष्य केले नाही.मुंबईतील लोंढे रोखणे हा वस्तुत: आर्थिक तरतूद करण्याचा नव्हे, तर कायदा करण्याचा विषय आहे. मात्र येत्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेच्या हातचा परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा हिसकावून घेण्याकरिता भाजपाने ही खेळी खेळली आहे. आता भाजपाच्या या खेळीला कडाडून विरोध होऊ लागला आहे. (विशेष प्रतिनिधी)