शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाचा तपशील द्या, अन्यथा उमेदवारी रद्द! निवडणुकीतील उमेदवारांना २३ डिसेंबरपर्यंतच मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:12 IST

- महेश पवार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील जाहीर करणे बंधनकारक आहे. ...

- महेश पवारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील जाहीर करणे बंधनकारक आहे. २३ डिसेंबरपर्यंत निवडणूक आयोग कार्यालयात उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे. त्यांना स्मरणपत्रे पाठविण्यात येत आहेत. मात्र, जे खर्च सादर करणार नाहीत त्यांची उमेदवारी तीन वर्षांसाठी रद्द केली जाऊ शकते. नियमामध्येच तशी तरतूद आहे, अशी माहिती निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

मुंबईतील ३६ जागांसाठी एकूण ४२० उमेदवार रिंगणात होते. त्या सर्वच उमेदवारांना निवडणूक कालावधीत प्रचार, सभा, कार्य अहवाल, जाहीरनामे, झेंडे, चहा, नाश्ता आदींसाठी झालेल्या खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. त्यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्याची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडून मतदानापूर्वी तीन वेळा केली जाते. मोठ्या पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत अपक्ष छोट्या किंवा अपक्ष उमेदवारांनाच खर्च कमी असतो. त्यामुळे त्यांच्याकडून खर्चाची माहिती सहजपणे मिळते. मात्र, मोठ्या पक्षांचे, विजयी उमेदवार यांच्याकडूनच तपशील येण्यास उशीर होतो याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते nआयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडून त्यामार्फतच व्यवहार करणे आवश्यक होते. nधनादेश, आरटीजीएस, याद्वारे आणि रोख रक्कम याचा तपशील सादर करावे लागतात. धनादेश दिला असल्यास तो क्लिअर झालेला असावा. 

खर्च सादर न केल्यास नोटीसnउमेदवारांनी विहित काळात खर्चाचा तपशील न दिल्यास त्यांना प्रथम स्मरणपत्रे पाठविली जातात. त्यानंतर नोटीस पाठविली जाते. त्यानंतरही त्यांनी तपशील न दिल्यास केंद्रीय आयोगाला कळविले जाते.nत्यानंतर तीन वर्षांसाठी उमेदवारी रद्द, पुढील निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाऊ शकते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग