दोन दिवसापूर्वी विरोध, आज एकाच कारमधून प्रवास; सामंत बंधू अन् राजन साळवींचा वाद मिटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:11 IST2025-02-13T10:08:50+5:302025-02-13T10:11:09+5:30

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वीच मंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Protest two days ago, travel in the same car today; Has the dispute between Samant brothers and Rajan Salvi been resolved? | दोन दिवसापूर्वी विरोध, आज एकाच कारमधून प्रवास; सामंत बंधू अन् राजन साळवींचा वाद मिटला?

दोन दिवसापूर्वी विरोध, आज एकाच कारमधून प्रवास; सामंत बंधू अन् राजन साळवींचा वाद मिटला?

ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश ठाण्यात होणार आहे. यापूर्वी काल बुधवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मंत्री उदय सामंत, किरण सामंत आणि राजळ साळवी यांच्यात बैठक झाली. गेल्या काही दिवसापासून साळवी आणि सामंत यांच्यात अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे, हा वाद काल मिटवल्याचे बोलले जात आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवास केला. यामुळे आता पक्ष प्रवेशाच्या आधी हा वाद मिटल्याचे बोलले जात आहे. 

देशात भ्रष्टाचारात वाढ! १८० देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत कितव्या नंबरवर?

काल झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार राजन साळवी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी अंतर्गत वाद मिटल्याचे संकेत दिले. गेल्या काही दिवसापासून राजन साळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, आता आज त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

काल झालेल्या बैठकीनंतर किरण सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. किरण सामंत म्हणाले, ते आज पण आमच्यासोबत आहेत आणि उद्यापण आमच्यासोबत आहेत. त्यांना योग्य तो मान सन्मान मिळेल. आमची बैठकीत उद्याचा पक्ष प्रवेश कसा असेल याबाबत चर्चा झाली. मोठं शक्तिप्रदेर्शन असेल, त्यांना योग्य तो मानसन्मान मिळेल, त्यांना काय द्यायचं यावर चर्चा झाली नाही, असंही किरण सामंत म्हणाले. 

उपनेतेपदाचा दिला राजीनामा

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच राजन साळवी यांच्या पक्षांतराच्या चर्चांना तोंड फुटले होते. पण, त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. शिवसेना फुटीनंतरही साळवी ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांना मातोश्रीचे निष्ठावंत समजले जात होते. पंरतु पक्षातीलच स्थानिक नेत्यासोबत खटके उडाल्याने ते नाराज होते. 

राजन साळवी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राजन साळवी हे गुरूवारी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करणार आहेत. 

Web Title: Protest two days ago, travel in the same car today; Has the dispute between Samant brothers and Rajan Salvi been resolved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.