उल्हासनगरात महावितरणच्या विरोधात प्रहारचं भर पावसात ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 21:33 IST2025-08-01T21:31:50+5:302025-08-01T21:33:22+5:30
उल्हासनगरात महावितरणच्या विरोधात प्रहारने भर पावसात ठिय्या आंदोलन केले.

उल्हासनगरात महावितरणच्या विरोधात प्रहारचं भर पावसात ठिय्या आंदोलन
उल्हासनगर: शहर पूर्वेतील विजेचा लपंडावाने व्यापाऱ्यांचा व्यापार बुडून नागरिकांनाचा रोजगार बुडाला. तसेच अनेक समस्या उभ्या ठाकल्याच्या निषेधार्थ प्रहारचे शहराध्यक्ष प्रधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालया समोर भरपावसात ठिय्या आंदोलन केले. अखेर समस्या सोडविण्याचे आश्वासन महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
उल्हासनगर पूर्वेत महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभारा विरोधात प्रहार पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला होता. विजेचा लंपडावामुळे व्यापारांचा व्यापार ठप्प होऊन नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. तसेच पाणी येण्याची वेळ आणि वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ एकच असल्याने, नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप पक्षाचे शहराध्यक्ष प्रधान पाटील यांनी केला. अव्वाच्या सव्वा वीज बील देवून वीज ग्राहकांची आर्थिक लूट, स्मार्ट मीटर नागरिकांच्या परवाना शिवाय बसू नये, आदी अनेक मागण्या पक्षाच्या वतीने करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील आणि शहराध्यक्ष प्रधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आज एकत्र येत आकाश कॉलनी येथील महावितरणच्या कार्यलया समोर भरपावसात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येत्या ४ दिवसात, प्रहारने केलेल्या मागण्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पाटील यांनी आंदोलन मागे घेतल. आंदोलनाला नागरिकांनी सहभाग घेतला असून आतातरी विजेचा लंपडाव थांबेल. अशी आशा प्रधान पाटील यांनी व्यक्त केली.