शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या वसतिगृहांची सुरक्षा ‘कंत्राटी’ गृहपालांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 11:47 IST

मुलींच्या सुरक्षेची, आरोग्याची आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी कंत्राटी व्यक्तीवर सोपवणे योग्य नाही...

ठळक मुद्देसमाज कल्याण विभागाचा निर्णय शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी कंत्राटी व्यक्तीवर सोपवणे योग्य नाहीसमाज कल्याण विभागाच्या कंत्राटी गृहपाल नियुक्त करण्याबाबत ६५ अटी -शर्ती गृहपालपदावर राजकीय व्यक्ती नको   

राहुल शिंदे- पुणे : राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहावर कंत्राटी पद्धतीवर गृहपालांची नियुक्ती केली जाणार असून, शासनातर्फे ११६ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, गृहपाल पद जबाबदारीचे असल्याने या पदावर शासकीय व्यक्तीचीच नियुक्ती होणे आवश्यक आहे. मुलींच्या सुरक्षेची, आरोग्याची आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी कंत्राटी व्यक्तीवर सोपवणे योग्य नाही. त्यामुळे शासन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात तसेच विभागांतर्गत पूर्वीपासून सुरू असलेल्या व सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या गृहपालपदावर मे.ब्रिक्स फॅसिलिटीज प्रा. लि. या  कंपनीमार्फत आऊटसोर्सिंगद्वारे (बाह्यस्रोत) कंत्राटी पदावर महिलांची गृहपाल पदे भरावीत, असे आदेश राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्यामुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटी गृहपालांची नियुक्ती न करता शासनाने स्वत:च गृहपाल नियुक्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.समाज कल्याण विभागाने कंत्राटी गृहपाल नियुक्त करण्याबाबत काढलेल्या १४ पानी पत्रात ६५ अटी -शर्ती टाकल्या आहेत. त्यानुसार कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या महिला कंत्राटी गृहपाल यांना कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव कामावर कमी करण्याचा अधिकार हा पुरवठादारांना असेल. त्यासाठी समाज कल्याण विभागाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही शाखेचा पदवीधारक व वयाची २४ वर्षे पूर्ण केलेल्या आणि ४५ वर्षाच्या आतील महिलेची गृहपाल म्हणून नियुक्ती केली जाईल. गृहपालपद हे निवासी असेल, त्यामुळे नियुक्त .............

गृहपालपदावर राजकीय व्यक्ती नको   कंत्राटी महिला गृहपालांची नियुक्ती करताना संबंधित महिला राजकीय पदावर नसावी याची कंत्राटदारांनी खात्री करावी. तसेच नियुक्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेतर्फे (बार्टी) नियुक्त कंत्राटी महिला गृहपालांना तीन दिवसाचे प्रशिक्षण बंधनकारक असणार आहे.........कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या कर्मचाºयांकडून शिजविलेल्या खिचडीतून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कंत्राटी गृहपालाकडे मुलींची सुरक्षा सोपविणे चुकीचे आहे. मुलींच्या सुरक्षेची  जबाबदारी शासनाचीच आहे. त्यामुळे या पदावर शासननियुक्त व्यक्ती असावी.- मनीषा धारणे, युवती जिल्हा समन्वयक, शिवसेना......वसतिगृहात राहणाºया विद्यार्थिनींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी एखाद्या कंत्राटी व्यक्तीवर सोपवणे योग्य होणार नाही. तसेच वसतिगृहातील मुली पालकांनाच आपल्या समस्या सांगू शकतात. त्यामुळे पालकांच्या भेटीबाबत लादलेले निर्बंध चुकीचे आहेत.- क्षितीजा होले, सचिव,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, कोथरूड......राज्यातील शासकीय वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी खासगीकरणातून गृहपाल नियुक्त करण्याचा समाज कल्याण विभागाचा निर्णय अंत्यत चुकीचा आहे. कंत्राटी महिलांच्या हातात मुलींची सुरक्षितता सोपवून राज्य सरकार त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.- मनाली भिलारे, प्रभारी, राष्ट्रवादी युवती काँग्रेस,प्रभारी पश्चिम महाराष्ट्र....

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीGovernmentसरकार