शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करानंतर आता पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 21:47 IST

मालमत्ता करात १४ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना आता पाणीपट्टीतही वाढ होण्याचे संकेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मालमत्ता करात १४ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असताना आता पाणीपट्टीतही वाढ होण्याचे संकेत आहेत. याबाबतचे निवेदन पालिका प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले आहे. मात्र पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने ही करवाढही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

रेडीरेकनर दरानुसार मालमत्ता करात सुधारणा करण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर पालिका प्रशासनाने मांडला होता. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध असल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. परंतु, दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीत आठ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याची सरसकट परवानगी पालिकेला आहे. त्यानुसारपाणीपट्टीत आठ टक्के वाढ करण्याची परवानगी मिळण्याबाबत प्रशासनाने निवेदन सादर केले आहे.

कोविडच्या काळात नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तर, दुसऱ्या बाजूला खर्चही वाढला आहे. त्यामुळे या वर्षात कोणतीही करवाढ होणार नाही. - यशवंत जाधव (अध्यक्ष, स्थायी समिती) यासाठी करावी लागणार पाणीपट्टीमध्ये वाढ

पाणीखात्याच्या खर्चात ५.२९ टक्कयांनी वाढ झाली आहे. सन २०१९-२०२० मध्ये ९८१ कोटी ८७ लाख असलेला खर्च २०२० -२०२१ मध्ये एक हजार ३३ कोटी ७८ लाखापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ करण्याची गरज असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. २०१२ मध्ये पाणीपट्टीत दरवर्षी आठ टक्के वाढ करण्याचा ठराव पालिकेने केला होता. मात्र, गेल्यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टीत वाढ करण्यात आली नव्हती.

मालमत्ता करवाढबाबत सोमवारी निर्णय

मालमत्ता कराच्या प्रस्तावित वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती प्रमाणेच विधी समितीच्या पटलावरही प्रशासनाने मांडला आहे. त्यामुळे स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला असला तरी सोमवारी होणाऱ्या विधी समितीच्या बैठकीत यावर काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईWaterपाणी