शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

विवेक पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई; कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 5:44 AM

Karnala Bank scam case : ईडीच्या अटकेत असलेल्या विवेक पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणी ईडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी माजी आमदार आणि बँकेचे माजी अध्यक्ष विवेक (विवेकानंद) शंकर पाटील यांची २३४ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. त्यात कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक भूखंडांचा समावेश आहे.ईडीच्या अटकेत असलेल्या विवेक पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणी ईडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आजच्या कारवाईमुळे पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या विवेक पाटील यांना ईडीने १५ जूनला अटक केली आहे. बँकेचे अध्यक्ष व संचालकांनी रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केल्यानंतर ईडीने याबाबत मनी लाॅंड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.२०१९-२० मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, पनवेल आणि मुंबईविरुद्ध ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान असे आढळून आले की, बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेक  पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि ते कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा क्रीडा अकादमीत टाकत होते. या दोन्ही संस्था पाटील यांनीच स्थापन केल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कर्नाळा बँकेच्या हजारो सभासदांच्या गुंतवणुकीच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी प्रथम पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला होता.ईडीच्या तपासादरम्यान असे आढळून आले, ही फसवणूक २००८ पासून सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पीएमएलए ॲक्ट अन्वये करण्यात आलेल्या तपासात ही फसवणूक ६७ बनावट खात्यांद्वारे करण्यात आली होती आणि ही फसवणूक व्याजासह सुमारे ५६० कोटी रुपयांची होत असल्याचे उजेडात आले. फसवणुकीवर पांघरूण घालण्यासाठी, पैसे वेगवेगळ्या खात्यांद्वारे पाटील यांनी स्थापन आणि नियंत्रित केलेल्या संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यांसारख्या मालमत्ता बांधण्यासाठी या रकमेचा वापर करण्यात आला.

बेनामी खात्यांवर आर्थिक व्यवहार- कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने ऑडिट केले असता कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले.  - यासंदर्भात पनवेलमध्ये संतप्त ठेवीदारांचे अनेक मोर्चेही निघाले होते. या गैरव्यवहार प्रकरणाची पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता. - आरबीआयच्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचेही म्हटले होते.

टॅग्स :Vivek Patilविवेक पाटीलbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय