शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शहिदांच्या कुटुंबीयांना व्यावसायिक प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:35 AM

मोफत प्रशिक्षण : माहिती तंत्रज्ञान आणि इतर अभ्यासक्रमांचा समावेश

ठळक मुद्देवीरनारी, पुत्र, निवृत्त सैनिकांना फायदा

पुणे :  शहीद जवानांच्या कुटुंबीयांना, तसेच माजी सैनिकांना त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया (डीएमजीएसए) च्या माजी  सैनिकांच्या संघटनेतर्फे माहिती तंत्रज्ञान आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  हे प्रशिक्षण विनामूल्य असून यामुळे आयटी आणि आयटीईएससारख्या  उद्योगांमध्ये आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास या अभ्यासक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.सीमेवर लढताना एखादा सैनिक शहीद झाल्यावर शासकीय नियमानुसार त्याच्या कुटुंबीयांना अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र, वीरपत्नी, वीरपुत्र, तसेच शहिदांच्या कुटुंबीयांतील अनेकांकडे कौशल्य नसल्याने त्यांना मोठ्या उद्योगांमध्ये रोजगार मिळविताना अनेक अडचणी येतात. रोजगार नसल्यामुळे त्यांना कुटुंब चालविताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यांची ही अडचण ओळखून त्यांचा कौशल्य विकास करण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे. ग्राहक संबंध व्यवस्थापन, डेटा एन्ट्री, तसेच माहिती तंत्रज्ञान उद्योगात या अनेक रोजगार आहेत. या संधी सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळण्यासाठी त्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीचे दोन अभ्यासक्रम आयोजिण्यात येणार आहेत. त्यानुसार व्यावसायिक कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. प्रशिक्षण दिल्यावर कंपन्यांमध्ये रोजगार शोधण्यासाठीही त्यांना मदत केली जाणार आहे. सुरुवातीला ७५ जणांना या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. तीन तुकड्यांमध्ये पिरंगुट, बालेवाडी आणि हडपसर येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  यासोबतच व्यावसायिक कौशल्याबरोबरच  कामाच्या ठिकाणचे वातावरण, आत्मविश्वास तसेच इतर गोष्टींचेही प्रशिक्षण त्यांना दिले जाणार आहेत........वीरनारी, पुत्र, निवृत्त सैनिकांना फायदा

च्राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच आदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीरनारी, वीरपुत्र तसेच निवृत्त सैनिकांची संख्या मोठी आहे. या अभ्यासक्रमाची संकल्पना ही अतिशय चांगली आहे. च्याबाबत या माजी सैनिकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना याबाबत माहिती दिल्यास या अभ्यासक्रमाचा फायदा त्यांना होणार आहे. या माध्यमातून त्यांना नवा रोजगार मिळवता येणार आहे. .... 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानFamilyपरिवारbusinessव्यवसाय