शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

'करून गेलो गाव' टीमची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी CM शिंदेंकडे सोपवला धनादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 9:48 PM

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं रात्रीच्या वेळी दरड कोसळून अनेक घरं ढिगाऱ्याखाली गेली अन् अनेकांनी जीवही गमावले.

Karun Gelo Gaav : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं रात्रीच्या वेळी दरड कोसळून अनेक घरं ढिगाऱ्याखाली गेली अन् अनेकांनी जीवही गमावले. इर्शाळवाडीतील ही घटना म्हणजे एक वाईट स्वप्नच. घटनेच्या तीन दिवस प्रशासनातर्फे तिथं बचावकार्य सुरू होतं. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांच्या परिजनांना मदतीचा हात देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडे दोन लाख रूपयांचा धनादेश सोपवला आहे. 

'करून गेलो गाव' या नाटकाचे निर्माते महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन धनादेश दिला. याबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले की, मराठी व हिंदी नाट्य, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आपला कायमस्वरूपी ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते तसेच 'करून गेलो गाव' या नाटकाचे निर्माते, अश्वमी थिएटरचे महेश मांजरेकर आणि अद्वैत थिएटरचे राहुल भंडारे यांनी आज माझ्या सदिच्छा भेट घेतली. 

 तसेच या नाटकाचा अमृत महोत्सवी प्रयोगानिमित्त निर्मात्यांनी तीन प्रयोगांचे आयोजन एकाच दिवशी करून त्यातून मिळणारी रक्कम ही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. आज या भेटीदरम्यान त्यांनी दोन लाखाचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांनी दाखवलेल्या या सहृदयतेबाबत त्यांचे कौतुक केले. तसेच हे नाटक यापुढे देखील असेच सुरू राहावे अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी सांगितलं.  

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणEknath Shindeएकनाथ शिंदेMahesh Manjrekarमहेश मांजरेकर Chief Ministerमुख्यमंत्री