शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचा अमेरिकेत डंका.. हळद रसाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 12:01 IST

शहरातील वाहनांची गर्दी, उद्योगांमुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठे असून नॅनो टेक्नोलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस प्रदूषणाच्या दुष्परिणामांसाठी प्रतिबंधक ठरू शकतो.

ठळक मुद्दे- नॅनो टेक्नोलॉजीद्वारे हळदीवर संशोधननॅनो टेक्नॉलॉजीमुळे एक किलो हळदीत असणारे कर्क्युमिन एका चमच्यात आणण्यात यश या शोधाचे ग्लोबल पेटंट मिळवण्याची प्रक्रियाही सुरु हळद रसाचे सेवन केल्यास प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे विपरित परिणाम टाळणे सहज शक्य

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेले डॉ. विजय कनुरू यांनी नॅनोटेक्नोलॉजीचा वापर करून हळदीवर संशोधन केले आहे. एरवी पाण्यात अजिबात न विरघळणाऱ्या हळदीला डॉ. कनुरू यांनी आपल्या संशोधनाद्वारे हळद रसाचे स्वरूप दिले आहे. हा रस पाण्यात विरघळण्याजोगा असून त्यातून कर्क्युमिन हे औषधी द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे दररोज सकाळी केवळ १ ते २ चमचे हळद रसाचे सेवन केल्यास दैनंदिन प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे अनेक विपरित परिणाम टाळणे सहज शक्य असल्याचे डॉ. कनुरू यांनी सांगितले.   या हळद रसाला त्यांंनी '' हरस टर्मेरिक ज्यूस'' असे नाव दिले असून डेली डीटॉक्सचे फायदे मिळवण्यासाठी त्याचे सेवन उपयुक्त ठरते, असे डॉ. कनुरू यांनी सांगितले. ते म्हणाले, शहरातील वाहनांची गर्दी, उद्योगांमुळे होणारे प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर होणारी बांधकामे यामुळे हवेत प्रदूषणाचे प्रमाण मोठे असते. प्रवास वा कामाच्या निमित्ताने बराच वेळ प्रदूषित हवेत राहावे लागल्यानंतर शारीरिक व मानसिक थकवा आणि तणाव जाणवतो. पीएम २.५ अर्थात अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांवाटे रक्तात मिसळत असल्यामुळे ते अधिक त्रासदायक ठरतात. अशा प्रदूषणाच्या त्रासामुळे शरीरात ठिकठिकाणी सूज येऊ शकते, तसेच ह्रदयाच्या रक्तवाहिन्या, यकृत आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होतात. पुण्यात या प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण मोठे असून नॅनो टेक्नोलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस प्रदूषणाच्या दुष्परिणामांसाठी प्रतिबंधक ठरू शकतो. या रसामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता साधली जाते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि त्वचा निरोगी होण्यासाठीही याची मोठी मदत होते, असे ते म्हणाले. आपल्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश असला तरी त्यातून आपल्याला मिळणा-या कर्क्युमिन या औषधी द्रव्याची मात्रा फारच कमी असते. शिवाय जे औषधी गुण त्यातून मिळतात ते शरीरात पूर्णत: शोषले जात नाहीत, असेही डॉ. कनुरू यांनी सांगितले. हळद रसाच्या निर्मितीत नॅनोटेक्नोलॉजीचा वापर झाल्यामुळे त्यात कर्क्युमिन द्रव्याचे प्रमाण चांगले राखता आले, शिवाय ते पेशींमध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते, असे ते म्हणाले. 

.........एक किलो हळद एका चमच्यातनॅनो टेक्नॉलॉजीमुळे एक किलो हळदीत असणारे कर्क्युमिन एका चमच्यात आणण्यात यश मिळाले आहे. एरवी एखादा माणूस दिवसाला एक किलो हळद खाऊ शकत नाही. परंतु, एक चमचा हळद रस सहज घेऊ शकतो. शिवाय या रसामध्ये हळदीचा कडवट, उग्रपणाही नसतो. नुसती हळद खाल्ली तर ती पचण्यास जड असते. हळद रसामुळे हळदीचे सर्व पोषक गुणधर्म शरीरात सहजपणे शोषले जातात. हळदीच्या अनोख्या गुणधर्मांचा फायदा मिळवून देणाऱ्या हळद रसाच्या व्यावसायिक उपयोगासाठी इंग्लंडमधल्या किंग्ज कॉलेज, केंब्रिज युनिव्हर्सिटीने रस दाखवला आहे. या शोधाचे ग्लोबल पेटंट मिळवण्याची प्रक्रियाही मी चालू केली आहे.-डॉ. विजय कनुरु

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ