शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर समस्या सुटतील; काँग्रेस प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:53 IST

सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेतले जात नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे

मुंबई : काँग्रेस नेत्यांना जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. ती भेट झाल्यानंतर सर्व समस्या सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त करताना खा. संजय राऊत यांनी अर्धवट माहितीवरून आमच्यावर अग्रलेखातून टीका करणे योग्य नाही, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लागवला.सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेतले जात नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे. तसेच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील जागा वाढवून मिळाव्यात अशीही मागणी आहे. या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर ‘सामना’मधून टीका करण्यात आली आहे. ‘खाट का कुरकुर करते?’ असे म्हटले आहे. यावर थोरात म्हणाले, जर शांत झोपायचे असेल तर कुरकुरणारी खाट नीट करावी लागते. त्यासाठी चावडीवर जाऊन भांडण केले पाहिजे असे नसते. राज्याच्या विकासाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सासऱ्याचे निधन झाल्याने आमची भेट लांबणीवर पडली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊत