शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

आत्महत्येपूर्वी 'ती' तरुणी संजय राठोडांशी ९० मिनिटं बोलली; तपासातून महत्त्वाची माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 10:07 AM

तरुणी आणि संजय राठोड यांच्यातील संवाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड; दोघांमध्ये अनेकदा संवाद

मुंबई: बंजारा समाजातील एका २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्यानं अडचणीत आलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. संबंधित तरुणी आणि राठोड यांनी अनेकदा एकमेकांना फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. तरुणीनं आत्महत्या करण्याच्या चार-पाच दिवसांपूर्वी तरुणी आणि राठोड यांच्यात फोनवरून संभाषण झालं होतं. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

बंजारा तरुणी आणि संजय राठोड यांच्यामध्ये झालेले संवाद तरुणीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. त्यातला एक संवाद ९० मिनिटांचा आहे. बंजारा तरुणीनं ७ फेब्रुवारीला पुण्यातील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर संजय राठोड अडचणीत सापडले. यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे आमदार असलेल्या राठोड यांची विरोधकांनी कोंडी केली. त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

'तरुणीच्या मोबाईलमधून काही पुरावे हाती लागले आहेत. तरुणीशी संभाषण झालेली व्यक्ती राठोड असल्याचं समजतं. तिनं सर्व संभाषणं रेकॉर्ड केली आहेत. बंजारा भाषेत ही संभाषणं झाली आहेत. त्याचं भाषांतर करण्याचं काम सुरू आहे,' अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे. मूळची बीडची रहिवासी असलेली तरुणी पुण्यात शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी पुण्यात वास्तव्यास होती.

तरुणीच्या मोबाईलमध्ये तिचे संवाद रेकॉर्ड झाले आहेत. मोबाईलमधील डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यात आला आहे. याशिवाय यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील एक सीसीटीव्ही फुटेजदेखील लॅबला पाठवण्यात आलं आहे. हे फुटेज ६ फेब्रुवारीचं म्हणजेच तरुणाच्या आत्महत्येच्या २४ तास आधीचं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फुटेजमध्ये संजय राठोडांचा जवळचा सहकारी अरुण राठोड दिसत आहे. अरुण आणि संजय राठोडांचा आणखी एक निकटवर्तीय विलास चव्हाण तरुणीसोबत पुण्यातल्या हेवन अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. याच इमारतीतून उडी मारून तरुणीनं आत्महत्या केली.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडShiv Senaशिवसेना