‘महाराष्ट्रातही व्हाव्यात प्रियंका गांधींच्या सभा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 06:56 IST2019-02-06T06:56:34+5:302019-02-06T06:56:49+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन तर नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या तीन सभा महाराष्ट्रात आयोजित कराव्यात, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीने केली आहे.

Priyanka Gandhi's meeting in Maharashtra | ‘महाराष्ट्रातही व्हाव्यात प्रियंका गांधींच्या सभा’

‘महाराष्ट्रातही व्हाव्यात प्रियंका गांधींच्या सभा’

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन तर नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या तीन सभा महाराष्ट्रात आयोजित कराव्यात, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीने केली आहे.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक झाली. टिळक भवन कार्यालयातील या बैठकीस शिंदे यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, नसीम खान, बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. संभाव्य स्थानिक नेते, प्रचारक, राज्य व केंद्रीय स्तरावरील नेते व प्रचारकांची यादी तयार करण्याच्या सूचना विभागीय समन्वयकांना दिल्या आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याही सभा मागितल्या असून त्यांचा होकार मिळताच सभा कुठे घ्यायची, याचा निर्णय घेऊ, अशी माहिती शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

Web Title: Priyanka Gandhi's meeting in Maharashtra