शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:00 IST

महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगाने नोटीस जारी करीत खासगी कंपन्यांना परवान्यासाठी पात्र ठरवत २२ जुलैला ऑनलाइन सुनावणी घेण्याची घोषणा केली.

नागपूर : महाराष्ट्रात समांतर वीज वितरण व्यवस्थेच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. महावितरणने मुंबई शहरातील वीज वितरणासाठी परवान्याची मागणी केल्यानंतर आता नागपूर, पुणे, ठाणे आदी शहरांमध्येही खासगी कंपन्यांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाली. 

महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगाने नोटीस जारी करीत खासगी कंपन्यांना परवान्यासाठी पात्र ठरवत २२ जुलैला ऑनलाइन सुनावणी घेण्याची घोषणा केली. या खासगी कंपन्यांना परवाना मिळाल्यास महावितरणचा एकाधिकार मोडीत निघणार आहे. ही कृती म्हणजे ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाच्या दिशेने पाऊल असल्याची टीका होऊ लागली आहे.

टोरंट पॉवरने नागपूरसह परिसरातील तसेच पुणे येथील वीज वितरणासाठी परवान्याची मागणी केली. यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. 

८ जानेवारी २०२३ रोजी आयोगाने नोटीस प्रकाशित करीत नागरिकांकडून सूचना व आक्षेप मागविले. याच प्रकारचा एक अर्ज अदानी इलेक्ट्रिसिटीने ठाणे, नवी मुंबई आदी भागांसाठी केला होता. आयोगाने आज नोटीस जारी करीत टोरंट व अदानीच्या अर्जावर २२ जुलैला जनसुनावणीची घोषणा केली.

कोणत्या कंपनीने कुठे परवाने मागितले?

महावितरण : मुंबई शहर व मीरा-भाईंदर मनपा क्षेत्र

टोरंट पॉवर : नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड,बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, रांजणगाव, चाकण, कुरकुंभ, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे मनपा क्षेत्र.

अदानी : मुलंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा व उरण.

अर्जाना हिरवा झेंडा

आयोगाने म्हटले की, टोरंट पॉवर व अदानी इलेक्ट्रिसिटी वीज वितरणासाठी पात्र ठरले. त्यांना परवाना देण्यासाठी प्रस्तावित केले आहे. आयोगाने या निर्णयावर १६ जुलैपर्यंत आक्षेप व सूचना मागविल्या. कंपन्यांना यावर तीन दिवसात उत्तर द्यायचे आहे. २२ जुलैला यासंदर्भात ऑनलाइन सुनावणी होईल.

टॅग्स :electricityवीजAdaniअदानीmahavitaranमहावितरणMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई