गोव्याहून मुंबईकडे परतणारी खासगी बस कोकणात उलटली; दोघांचा मृत्यू तर 32 प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 10:48 IST2017-09-02T07:40:12+5:302017-09-02T10:48:03+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटूळ घाटात अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

गोव्याहून मुंबईकडे परतणारी खासगी बस कोकणात उलटली; दोघांचा मृत्यू तर 32 प्रवासी जखमी
रत्नागिरी, दि. 2- गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या एका खासगी बसचा शुक्रवारी रात्री राजापूरमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत. राजापूरच्या वाटूळ गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस शुक्रवारी संध्याकाळी गोव्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले अनेक जण या बसने प्रवास करत होते. शनिवारी सकाळी ही बस बोरिवलीला पोहचणार होती. मात्र, काल रात्री वाटूळ गावाजवळ असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस उलटली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय, अपघातात ३२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लांजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिवराम यशवंत परब (५८ रा. कालेलि कुडाळ) आणि रेखा रमाकांत पंडित (५५ रा. परळ, मुंबई) अशी मृत्यू झालेल्या दोन प्रवाशांची नावं आहेत.