सोलापुरात पुलावरून कोसळली खासगी बस
By Admin | Updated: October 8, 2014 04:09 IST2014-10-08T04:09:00+5:302014-10-08T04:09:00+5:30
आंध्र प्रदेशमधील भाविकांची खासगी बस करमाळा तालुक्यातील कविटगावाजवळ पुलाचा कठडा तोडून थेट खाली कोसळली.

सोलापुरात पुलावरून कोसळली खासगी बस
करमाळा (जि. सोलापूर) : आंध्र प्रदेशमधील भाविकांची खासगी बस करमाळा तालुक्यातील कविटगावाजवळ पुलाचा कठडा तोडून थेट खाली कोसळली. या अपघातात ८ प्रवासी ठार तर १७ जण जखमी झाले. हा अपघात अहमदनगर-टेभूर्णी राज्यमार्गावर मंगळवारी पहाटे ३च्या सुमारास झाला.
आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्याच्या मच्छलीपट्टणम खेड्यातील भाविक गायश्री ट्रॅव्हलच्या बसने शिर्डीला गेले होते. तेथून ते पंढरपूरकडे जात असताना कविटगावानजीक चालक बोधीरमेश बाबू यांचा ताबा सुटल्याने बस पुलावरून खाली कोसळली.
या अपघातात बसमधील चलगलचेट्टी पांडुरंगरंगा (६०), व्यंकटेश रम्मा गेंदल (४५), लक्ष्मी (४५), रेश्मा (२०), शेवमणी (४५), लक्ष्मीपालमुड्डू (५५) व एन. लक्ष्मीकुमारी (५५) हे जागीच ठार झाले. बसमध्ये एकूण
६० भाविक होते.