शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कैद्यांनी अनुभवले ‘नादब्रह्म’

By admin | Updated: February 17, 2017 21:01 IST

जग अत्यंत सुंदर आहे. माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करुन जाणारे संगीत त्यामध्ये आहे. कारागृहाच्या चार भिंतींच्या आत हे संगीत ऐकायला मिळते कुठे? त्यातही जर उस्ताद जाकीर हुसेनसारख्या

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 -  जग अत्यंत सुंदर आहे. माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करुन जाणारे संगीत त्यामध्ये आहे. कारागृहाच्या चार भिंतींच्या आत हे संगीत ऐकायला मिळते कुठे? त्यातही जर उस्ताद जाकीर हुसेनसारख्या ‘लिव्हींग लिजंड’चे वादन अनुभवने दुरच. परंतु कैद्यांच्या दृष्टीने कल्पनेच्या पलिकडचं हे संगीतलेणं त्यांना शुक्रवारी अनुभवता आलं. येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये रंगलेल्या या स्वराविष्कारामधून कैद्यांनी ‘नादब्रह्मा’चा आनंद घेतला. याची देही याची डोळा अनुभवलेले उस्ताजही पाहून अनेक कैद्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. 
महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळाच्यावतीने कैद्यांसाठी मागील दिड वर्षांपासून  ‘प्रेरणापथ’ नावाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उस्ताद जाहीर हुसेन यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उस्तादजींनी कैद्यांशी संवाद साधला. यावेळी कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पुणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण, कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी, अ‍ॅड. प्रताप परदेशी यावेळी उपस्थित होते. 
उस्तादजींनी तबल्याचे तालांची माहिती देतानाच वैशिष्ट्यपुर्ण वादनाने सर्वांना खिळवून ठेवले. त्यांची तबल्यावर पडणारी एक एक थाप उपस्थितांच्या मनावर छाप उमटवून जात होती. पोलीस अधिकारीच काय परंतु खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेल्या खतरनाक गुन्हेगारांच्या तोंडामधूनही  ‘वाह’ ची दाद बाहेर पडत होती. कारागृहाच्या चार भिंतींआड आपण जगातलं सर्वोत्तम असं काही गमावून बसलो आहोत ही भावना अनेकांच्या मनात उचंबळून आली. उस्तादजींनी तर पाहुण्यांचे स्वागत, धावणारी रेल्वे, शंख व डमरू यांचा एकत्रित आवाज तबल्याच्या माध्यमातून काढून दाखवला. एकूणच भारावलेल्या या वातावरणामुळे हा परिसर नेमका कारागृहाचा आहे की एखाद्या संगीत नगरीचा असा प्रश्न पडला होता. 
उस्तादजी म्हणाले, ‘‘कारागृहात आलात म्हणजे तुमचे जीवन संपलेले नाही. एक चूक घडून गेली ती गेली. आता योग्य मार्गावरुन मार्गाक्रमण करा. आज कारागृहात तबला वाजवताना भेट झाली, मात्र पुढील वेळीआपली भेट मुंबई, पुण्यातील सभागृहांत कार्यक्रमामध्ये व्हावी. कारागृहाच्या भिंतीबाहरे मी तुमची वाट पहातोय. तबला वादनास कैद्यांनी दिलेला प्रतिसाद हा सवाईगंधर्व किंवा इतर ठिकाणी होणा-या कार्यक्रमांच्या प्रेक्षकांप्रमाणेच भरभरून आहे.’’ यावेळी एका कैद्याने मोहंमद रफी यांचे गाणे सादर केले.
 
तबला वादक ज्यांना आपला आदर्श मानतात असा तबल्याच्या मानदंडासमोर वादन करण्याची संधी कोण सोडेल? कारागृहाच्या महिला अधिकारी तेजश्री पोवार यांना ही संधी मिळाली. उस्ताद जाकीर हुसेन यांनी पवार यांना मंचावर बोलावले. पोवार यांनीही उस्तादजींना अभिवादन करुन चार - पाच ताल वाजवले. त्यांच्या वादनाला उस्तादजींनी भरभरुन दाद दिली. यावर पोवार म्हणाल्या,  ‘लहानपणापासून आवड असल्यामुळे तबलावादन शिकले. कोल्हापुरला ज्यांच्या कार्यक्रमाची कार्यक्रमाची प्रयत्न करुनही तिकीटे मिळाली नाहीत, त्या उस्तादजींसमोर आज तबला वाजवण्याची संधी मिळाली. आयुष्यातील हा क्षण अनमोल आहे.’