शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 10:07 PM

मोदींच्या आईकडून खाल्ला होता मार...

ठळक मुद्देअकराव्या मजल्यावरील गच्चीतून पडले मगरीचे पिलू आणले म्हणनू मोदींबरोबर  आईचा खाल्ला होता मार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र आणि पतंजली योगपीठाचे सदस्य हरिकृष्ण घनशामदास शहा (वय ६४) यांचे अकराव्या मजल्यावरील गच्चीतून पडून शनिवारी सायंकाळी दुर्दैवी निधन झाले...नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथील गावचे मुळ रहिवासी असलेले शहा हे त्यांचे वर्गमित्र होते. मोदींच्या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. शनिवारी सायंकाळी ते आपले मावसभाऊ सुरेश मेहता यांच्या गोखलेनगरमधील तपोवन येथील घरी कुटुंबियांसहित गेले होते. घरगुती कार्यक्रम संपल्यावर त्यांनी कुटुंबियांना प्राणायाम करून येतो असे सांगितले.

त्यांचा गाडीचालक खाली वाट पाहत होता. सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ते अचानक गच्चीतून खाली पडले. उंचावरून पाहिल्यावर चक्कर येणारा व्हर्टिगो हा विकार असल्याने हा अपघात घडल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, जास्त रक्तस्त्राव झालेला असल्याने त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाले.नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथील घराजवळच शहा यांचे घर होते. एकाच शाळेत ते शिकत होते. त्यानंतर ते पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकण्यासाठी आले. रविवार पेठेतील भांडेआळी येथे त्यांचे जुने घर होते. त्यानंतर त्यांनी शेअर ब्रोकरचा व्यवसाय सुरू केला.सामाजिक जीवनातही ते सक्रीय होते. बाबा रामदेव यांच्या पंतजली योगपीठाचे ते विश्वस्त होते. रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेही ते जवळचे मित्र होते..

................

मोदींच्या आईकडून खाल्ला होता मार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेत असताना मगरीचे पिलू पकडून आणले होते. घरी आल्यावर त्यांची आई रागावली. तुला जर कोणी आईपासून दूर केले तर कसे वाटेल, असे विचारून मोदी आणि त्यांच्याबरोबरील हरिकृष्ण यांना रट्टे लगावले होते. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा