शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कांदा उत्पादकाची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना ‘मनीऑर्डर’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:55 AM

खर्च ४५ हजार, उत्पन्न अवघे ८ हजार ५०० रुपये

बारामती : तालुक्यातील जैनकवाडी येथील शेतकऱ्याचे कांदा उत्पादनातून नुकसान झाले. शेतकºयाचा खर्च ४५ हजार झाला. उत्पन्न मात्र ८ हजार ५०० रुपये मिळाले. त्यातून उद्विग्न झालेल्या शेतकºयाने बारामती येथे चक्क दोन टन कांदा नागरिकांना फुकट वाटला. या वेळी ठेवण्यात आलेल्या दानपेटीत जमा झालेली १ हजार ४१९ रुपये एवढी रक्कम या शेतकºयाने पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना सोमवारी पोस्टाने ‘मनीआॅर्डर’द्वारे पाठवली आहे.जैनकवाडी येथील तरुण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने ५ डिसेंबर रोजी नागरिकांना फुकट कांदा वाटला. ‘कांदा नेणाºयांनी स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठविण्यात येणार आहेत,’ असा फलक या ठिकाणी लावला होता. या वेळी कांदा मोफत नेणाºया नागरिकांनी दानपेटीत २ हजार ८३८ रुपये जमा केले होते. काळे यांनी ही रक्कम समान विभागून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनीआॅर्डरने पाठविली आहे.काळे यांचे जैनकवाडी परिसरात दीड एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली. त्यासाठी त्यांना ४५ हजार रुपये खर्च आला. दीड एकरात १५० पिशव्या कांदा उत्पादन झाले. त्यांपैकी १२० बॅग कांदा कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला. या कांद्याला त्यांना प्रतिकिलो अवघा ४ रुपये भाव मिळाला. कांदाविक्रीतून वाहतूक खर्च वगळता १२ हजार ४८८ रुपये त्यांच्या हाती आले. त्यांपैकी बारदान्याचा ३,५०० रुपये खर्च वजा जाता ८ हजार ९८८ रुपये उरले. त्यामुळे खर्च ४५ हजार झाला; उत्पन्न मात्र ८ हजार ५०० रुपये मिळाले. त्यामुळे काळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. दिनेश काळे यांनी शेती विकसित करण्यासाठी कॅ नरा बँकेकडून चार वर्षांपूर्वी ७ लाख रुपये कर्ज घेतले होते. आता व्याजासह ही रक्कम ११ लाखांवर पोहोचली आहे. हे कर्ज भरण्यासाठी आता बँकेकडून तगादा चालू झाला आहे. त्यामुळे कष्ट करूनदेखील उपयोग होत नाही. कष्ट करून पिकविलेला कांदा फुकट वाटताना माझ्या मनाला बरे वाटले असेल का? पण कांदा वाटून मनापासूनचा उद्रेक व्यक्त केल्याचे दिनेश काळे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. ४ रुपये दराने विकलेल्या कांद्याचा बाजारातील दर १५ रुपये शेतकरी त्याने घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाची किंमत ठरवू शकत नाही, ही शोकांतिका आहे. उलट ४ रुपये दराने विक्री केलेला कांदा मात्र बाजारात १२ ते १५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागत आहे. शेती करताना आमच्या वाट्याला आलेली उपेक्षा मुलांना सहन करावी लागू नये म्हणून त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्हा दोघा नवरा-बायकोचा आहे. पण, मुलांनी शाळेत जाताना ५० रुपये मागितले तरी अनेक वेळा काळजावर दगड ठेवून ‘नाहीत’ असे म्हणावे लागते, अशी व्यथा शेतकरी दिनेश काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसonionकांदाFarmerशेतकरी