शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ६ तारखेपासून ५७व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील १९ संघ सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:13 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नाट्य मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला असल्याने सिंधुदुर्गातील नाट्य चळवळ अधिकच जोमाने वाढते आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.

- रजनीकांत कदमकुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या ५७व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीची सुरुवात ६ नोव्हेंबर रोजी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या बिकट वाट वहिवाट या नाटकाने होत असून, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नाट्य मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला असल्याने सिंधुदुर्गातील नाट्य चळवळ अधिकच जोमाने वाढते आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्यावतीने महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे आयोजन दरवर्षी संपूर्ण राज्यभरात केले जाते. यंदा या स्पर्धेचे ५७ वे वर्ष असून या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रत्येक विभागात प्रारंभ होणार असून रत्नागिरी केंद्रावरील या प्राथमिक फेरीची सुरुवात ६ नोव्हेंबरपासून रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे. या केंद्रावर ही स्पर्धा २३ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, या कालावधीत १९ नाटकांचे नाट्याविष्कार यावेळी सादर होणार आहेत.देशाला कोकणाने नेहमीच सर्वच ललित कला क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कलाकार दिले आहेत. नाट्यक्षेत्रात ही कोकण नेहमीच अग्रेसर राहीले आहे. या कोकणामध्ये मोठ्या संख्येने हौशी नाट्ये मंडळे असून या मंडळांच्यां वतीने दरवर्षी विविध विषयावरती नाटके बसविण्यात येतात. त्यामुळे या नाट्य क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या हौशी नाट्यमंडळे व कलाकारांना आपली कला सादर करता यावी हा उद्देश ठेवत शासनाच्यावतीने या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. हौशी नाट्य मंडळांनाही या स्पर्धेमुळे चांगले व्यासपीठ मिळाले आहे. कला क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख ही दशावतार या नाट्यकलेने केली जात आहे. या जिल्ह्यात नाट्य चळवळ ही फार पूर्वीपासून सुरू असून ती आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.यंदा ही स्पर्धा ६ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, पहिले नाटक कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे, बिकट वाट वहिवाट (दिग्दर्शन अमित देसाई) हे नाटक सादर होणार आहे तर दि.७ नोव्हेंबर रोजी कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे, मागच्या बेंचवरची मुलगी (दिग्द.रघुनाथ कदम), दि. ८ नोव्हें. रोजी श्रीरंग, रत्नागिरीचे, वरचा मजला रिकामा (दिग्द.भाग्येश खरे), दि. ९ नोव्हें. रोजी केळकर महाविद्यालय, देवगडचे, ब्रेकिंग न्यूज (दिग्द. अभिषेक कोयंडे), दि. १० रोजी श्री देवी जुगाई कलामंच, कोसुंब संगमेश्वरचे, मन कोवळे उन्हाचे (दिग्द. सुनील जाधव), दि.११ रोजी संकल्प कलामंचचे, मी इतिहास गाडला नाही (दिग्द.चंद्रकांत कांबळे), दि. १३ रोजी खल्वायन रत्नागिरीचे, कॉफी (दिग्द. प्रणव यादव), दि. १४ रोजी साईकला कला क्रीडा मंच, सिंधुदुर्गचे, अशुध्द बीजापोटी (दिग्द. केदार देसाई), दि. १५ रोजी सहयोग, रत्नागिरीचे अतर्क्य, दि. १६ रोजी ओम साई मंडळ मिरजोळे, रत्नागिरीचे, ती रात्र (दिग्द. शेखर जोशी), दि. १७ रोजी नेहरूबुवा कलादर्शन नाट्यमंडळ पालीचे, कुणी तरी आहे तिथं (दिग्द. अमोल रेडीज), दि. १८ रोजी संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच देवरूखचे, ती रात्र (दिग्द. संजय सावंत), दि. २० रोजी कलावलय वेंगुर्लाचे, निखारे (दिग्द. संजय पुनाळेकर) ही नाटके दररोज सायंकांळी ७ वाजता सुरू होणार आहेत.तर दि. २१ नोव्हें. रोजी सकाळी ११.३० वा. रत्नसिंधु, सामाजिक व शैक्षणिक विकाससेवा संस्था हातखंबाचे, येस माय डियर (दिग्द. पुजा जोशी) व सायंकांळी ७ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान चिपळूणचे, कोर्ट मार्शल (दिग्द.अभिजित काटदरे), दि. २२ नोव्हें. रोजी स. ११.३० वा. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाचे, कॅप्टन.... कॅप्टन (दिग्द.मनोहर सुर्वे), सायं. ७ वा. बाबा वर्दम थिएटर्स कुडाळचे, एकदा पहावं न करून ( दिग्द. वर्षा वैद्य), दि. २३ नोव्हें. रोजी स. ११.३० वा. आभार सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ रत्नागिरीचे, अल्बम (दिग्द.चंद्रशेखर मुळ्ये) व सायं. ७ वा. अक्षरसिंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्गचे, भावीण (दिग्द. सुहास वरूणकर) ही नाटके सादर होणार आहे.तीन ते चार महीने चालते तालिमया स्पर्धेच्या अगोदरच तीन ते चार महिने नाट्य मंडळे नाटकाच्या तालीमी घेतात. जसजसे स्पर्धेचे दिवस जवळ येतात तसतशी या नाट्यकलाकारांचा उत्साह जोमाने वाढत असतो.सिंधुदुर्गातील सात संघ सहभागी.या नाट्य स्पर्धेत १९ संघ सहभागी झाले असून यामध्ये सिंधुदुर्गातील ७ संघानी सहभाग घेतला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील १२ संघ स्पर्धेत आहेत. यंदा या स्पर्धेत सिंधुदुर्गातील संघाचा सहभाग वाढला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी