म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती कमी होणार; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:38 PM2023-11-24T13:38:05+5:302023-11-24T13:38:32+5:30

अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली आहे.

Prices of 11 thousand houses of MHADA will decrease; Information from Housing Minister Atul Sawan | म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती कमी होणार; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची माहिती

म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती कमी होणार; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची माहिती

मुंबई : म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. यावेळी  विक्री सरसकट नाहीतर म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्याच किमती कमी होणार असल्याचे अतुल सावे यांनी स्पष्ट केले आहे. अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सुद्धा अतुल सावे यांनी यावेळी दिली आहे.

म्हाडाच्या जवळपास ११ हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचे वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्याने म्हाडाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितले आहे. संबंधित घरांचे वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. अशा जवळपास ११ हजार घरांची कमी किमती करुन पुन्हा विक्री करण्यात येणार असून नुकसान टाळत महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील सदनिकांची सोडत पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत शुक्रवारी (दि. २४) होणारी होती. ही सोडत प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून, लवकरच अर्जदारांना त्याबाबत कळविण्यात येईल, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे.

या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५ हजार ४२५, सोलापूरमधील ६९, सांगलीतील ३२ व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे.

Web Title: Prices of 11 thousand houses of MHADA will decrease; Information from Housing Minister Atul Sawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.