Dr. Jayant Narlikar : देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
पुणे - देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे साहित्य संमेलन मार्च महिन्यात होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या संलग्न संस्था आणि प्रतिनिधींच्या बैठकीत जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
जयंत नारळीकर यांनी विज्ञानकथा, तसेच अनेक विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसेच पद्मविभूष पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तर राज्य सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
Web Title: As the President of the 94th All India Marathi Literary Conference, Dr. Jayant Narlikar