शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'बाप्पां'च्या आगमनाला असणार 'वरुणराजा'ची हजेरी;पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 20:05 IST

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे मध्य भारत, उत्तर भारतासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.पुढील ४ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे गणरायांच्या आगमनाला वरुणराजाची जोरदार हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस झाला. घाटमाथ्यावरील ताम्हिणी १९०, कोयना (नवजा) १४०, दावडी १३०, डोंगरवाडी १२०, शिरगाव, भिरा ११०, महाबळेश्वर येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. कोकणातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला़ मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी सकाळी तयार झाले आहे. तसेच उत्तर भारतात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने सध्या देशात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ईशान्य भारत, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशासह हिमाचल प्रदेशापर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे, सातारा जिल्ह्यात चार दिवस जोरदार पुणे व सातारा जिल्ह्यात २० ते २३ ऑगस्ट दरम्यान घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असून रायगड जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे़.२० ऑगस्टला परभणी, हिंगोली, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून २१ ऑगस्टला जालना, औरंगाबाद, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी उघडीप मिळाली़ दिवसभरात अनेकदा सूर्यदर्शनही झाले. १ जूनपासून पुणे शहरात तब्बल ५५६़५ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या तुलनेत १५० मिमीने अधिक आहे. लोहगाव येथे आतापर्यंत ५९० मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा २५५.४ मिमीने अधिक आहे.पाषाण येथे आतापर्यंत ५़0४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसGanesh Mahotsavगणेशोत्सवweatherहवामानcorona virusकोरोना वायरस बातम्या