‘वन व्हर्सेस आॅल’ची तयारी ठेवा, मुख्यमंत्र्यांचे भाजपा नेत्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:25 AM2018-06-05T02:25:49+5:302018-06-05T02:25:49+5:30

भाजपाच्या विरोधात सगळे पक्ष एकवटण्याची तयारी दिल्लीपासून गल्लीपर्यंत करीत आहेत. तेव्हा ‘वन व्हर्सेस आॅल’अशा लढाईची तयारी ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपाचे प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या येथे आयोजित बैठकीत केले.

Prepare for 'one variants of', appealed to BJP leaders of the Chief Minister | ‘वन व्हर्सेस आॅल’ची तयारी ठेवा, मुख्यमंत्र्यांचे भाजपा नेत्यांना आवाहन

‘वन व्हर्सेस आॅल’ची तयारी ठेवा, मुख्यमंत्र्यांचे भाजपा नेत्यांना आवाहन

मुंबई : भाजपाच्या विरोधात सगळे पक्ष एकवटण्याची तयारी दिल्लीपासून गल्लीपर्यंत करीत आहेत. तेव्हा ‘वन व्हर्सेस आॅल’अशा लढाईची तयारी ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपाचे प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या येथे आयोजित बैठकीत केले.
शिवसेनेला सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू पण ते झाले नाही तर स्वबळावर निवडणूक लढावी लागेल. त्यासाठी सज्ज राहा. शिवसेनेशिवायही आपण जिंकू शकतो हे पालघरने दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध एक समज निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहेत. मात्र, ती वास्तविकता नाही. गेल्या चार वर्षांत आम्ही जनतेसाठी प्रचंड कामे केली ती घेऊन पुन्हा जनतेत जा. ११ ठिकाणी पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला तर त्याचीच चर्चा अधिक होते पण भाजपाने गेल्या काही वर्षांत ११ राज्ये जिंकली हे आम्हाला आत्मविश्वासाने सांगता आले पाहिजे. कर्नाटमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार असे
सगळे म्हणत होते पण सर्वाधिक
जागा भाजपाने जिंकल्या. याचा
अर्थ विरोधक आणि काही
माध्यमांनी निर्माण केलेले चित्र
आणि वास्तव वेगळे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फुंडकर यांना श्रद्धांजली
पक्षसंघटना आणि कार्यकर्ते हेच आमचे बळ आहे. बूथपातळीपर्यंतची रचना मजबूत करा. स्वबळावर लढायचे तर हीच यंत्रणा कामी येईल, असे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे म्हणाले. यावेळी भाजपाचे मंत्री, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांची वेगळी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Prepare for 'one variants of', appealed to BJP leaders of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.