शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

‘घुमान’ची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: March 31, 2015 03:33 IST

पंजाबमधील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली

पुणे : पंजाबमधील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, महाराष्ट्रातील प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी घुमानवासी सज्ज झाले आहेत. अमृतसर ते घुमान या मुख्य मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे संत नामदेवांच्या भूमीतून सर्व मंडळी घुमानला येत आहे, ही पंजाबवासीयांसाठी आनंदाची बाब असल्याने हे आपल्या घरचेच कार्य आहे, या भावनेतून पंजाबी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पंजाब सरकारनेही ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.मुख्य मंडप आणि परिसंवादाच्या सभागृहांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंजाब सरकारने घुमानच्या परिसरात स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविल्याने पाच दिवस अखंडित व पुरेसा वीजपुरवठा होऊ शकेल. संमेलनकाळात प्रतिनिधींच्या सोयीसाठी तब्बल १०० बसेसची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे देसडला यांनी सांगितले.स्वच्छतेसाठी रेल्वेमध्ये ५ ते ६ स्वयंसेवकांची तुकडी तैनात करण्यात आली असून, ४० तासांचा प्रवास कंटाळवाणा वाटू नये यासाठी ट्रेनमध्ये शब्दकोडे, अंताक्षरी स्पर्धा आदींचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच रेल्वेने जाणाऱ्या सर्व २,८०० प्रवाशांचा अपघाती विमा उतरविण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.