शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पूर्व द्रुतगती महामार्ग २ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:59 AM

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.

मुंबई - महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास गोवंडी येथे जमाव पूर्व द्रुतगती महामार्गावर उतरला. जमावामध्ये ७-१० वर्षांच्या मुलांची संख्या मोठी होती. जमावाने पुलावर येताना उड्डाणपुलाखाली ठेवलेले बॅरिगेट्स सोबत आणले होते. सदर बॅरिगेट्स द्रुतगती मार्गावर लावून वाहतूक रोखली. नेहमीपेक्षा वाहनांची वर्दळ कमी असल्याने सुरुवातीला मोठी कोंडी झाली नाही, परंतु दुपारी १नंतर द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.सकाळी ९च्या सुमारास आणि दुपारी १२ वाजता आंदोलकांनी चेंबूर नाका येथे प्रत्येकी १५ मिनिटे ‘रास्ता रोको’ केला. यामुळे सायन पनवेल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उर्वरित दिवसभर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, चेंबूर नाक्यावर आंदोलन करणारे आंदोलक चेंबूर परिसरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर वाहतूक रोखूत होते़महिला व तरुणींचाही सहभागगोवंडी व चेंबूरमध्ये ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांत महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता. प्रामुख्याने गोवंडी येथील पूर्व द्रुतगती महामार्ग रोखण्यात महिला पुढे होत्या. महिला घोषणाबाजी करत पुलावर उतरल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणल्यानंतर महिला आंदोलक रस्त्यावर बसल्या. निळे झेंडे, निषेधात्मक फलक हाती घेऊन या महिला घोषणा देत होत्या, तर मुलींनी रस्त्यावरील वाहतूक रोखली होती. रस्त्यावर येणाºया प्रत्येक वाहनास तरुणींसह लहान मुलीही रोखत होत्या.मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावीआंबेडकरी जनतेचा रोष पाहता, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वातावरण निवळण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांची एक संयुक्त बैठक घेण्याची मागणी भीम क्रांती संघटनेने केली आहे. भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यासंदर्भात नेमकी काय कारवाई करणार? यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित बैठकीत उजाळा टाकावा. जेणेकरून राज्यात शांतता प्रस्थापित होईल, असे मत संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.आठवले, पासवान यांनी राजीनामा द्यावा!केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद