शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

Pravin Darekar:'तेव्हा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते; आता कुठे गेला ठाकरी बाणा?', प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 2:15 PM

'आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. '

मुंबई:नवाब मलिकांच्या (nawab malik) राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकला. त्यानंतर आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'कुठे गेला ठाकरी बाणा?'गुन्हेगारांशी संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिशी घालता. कुठे गेला तुमचा ठाकरी बाणा? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. देशद्रोह्यांना मदत करणाऱ्या मंत्र्यासाठी सरकारचे नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात. गृहमंत्रीही या पुतळ्याखाली आंदोलनाला बसतात. त्या ठिकाणी महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, अशी घणाघाती टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.

'देशद्र्योसाठी सरकारचे आंदोलन'या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला पाझर फुटत नाही. बॉम्बस्फोटात लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, यांना त्याचीही लाज वाटत नाही. पण आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मलिकांचा राजीनामा घेण्यासाठीच आज लाखोंचा जनसागर लोटलाय. देशद्र्योसाठी सरकारमधील नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात, गृहमंत्रीही बसतात. आज गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, असं दरेकर म्हणाले.

'फडणवीसांना कुणीही संपवू शकत नाही'देवेंद्र फडणवीसांना संपवण्याचा कट सुरू आहे. पण, काल देवेंद्रजींनी तुमचे कपडे उतरवले, तुमचे षडयंत्र फडणवीसांनी उघड केले. पुराव्यासहीत सर्व आरोप सिद्ध केले. फडणवीसांना कोणीही संपवू शकत नाही. फडणवीस या प्रवृत्ती संपवल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी सांगितले. सत्तेला लाथ मारुन बाळासाहेबांचा कित्ता, ठाकरी बाणा उद्धव ठाकरेंनी गिरवावा. जनतेचा एल्गार, संताप एवढा मोठा आहे की तुमचं सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकUddhav Thackerayउद्धव ठाकरे