प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:25 PM2019-10-05T18:25:32+5:302019-10-05T18:25:48+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यावर ठाम आहेत.

Praveen Tarade said 'about aarey forest ... tarade critics on Cinema actor who went to Mumbai from Pune | प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला 

प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला 

Next

मुंबई - अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेला आरेतील वृक्षतोडीचा मुद्दा कालपासून पुन्हा एकदा पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यानंतर लगेचच संध्याकाळी आरेतील झाडं तोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा आरेचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. याप्रकरणी सिनेअभिनेता आणि मुळशी पॅटर्न फेम प्रविण तरडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. तरडेंनी आरेतील वृक्षतोडीचे समर्थन करत विरोध करणाऱ्यांना टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यावर ठाम आहेत. तर शिवसेनेनं या प्रकल्पाला असलेला विरोध वारंवार बोलून दाखवला आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे. या प्रकरणात आता प्रविण तरडेंनीही उडी घेतली आहे. 

''पुण्यातून मुंबईत राहायला गेलेले बरेच नाटक सिनेमावाले म्हणतायेत झाडे का कापतायेत? मग काय तुम्ही घेतलेली घरे पाडून मेट्रो करायची का ? वाढलेली गर्दी जबाबदार आहे'' असे म्हणत प्रविण तरडेंनी मेट्रो कारशेड साठी पाडण्यात येणाऱ्या झाडांचे समर्थन केले आहे. मेट्रोचा प्रकल्प उभारणीसाठी ते गरज असल्याचं सूचवताना, आपल्या सिनेकलाकार मित्रांवर प्रविण यांनी टीका केली आहे. 
दरम्यान, मुख्यमंत्री मात्र मेट्रोचं कारशेडचं आरेमध्ये उभारण्यावर ठाम आहेत. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक वेगवान होईल. जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोतून प्रवास केल्यावर प्रदूषण होईल, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
 

Web Title: Praveen Tarade said 'about aarey forest ... tarade critics on Cinema actor who went to Mumbai from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.