Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक अडचणीत; ईडी 11 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 09:55 IST2022-11-03T09:54:38+5:302022-11-03T09:55:03+5:30
Pratap Sarnaik: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले होते. त्यात प्रताप सरनाईक देखील होते.

Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक अडचणीत; ईडी 11 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार
महायुतीच्या सरकारमध्ये असताना सध्या शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढणार आहेत. शिवसेनेत असल्याने भाजपाने सुडबुद्धीने ईडीची कारवाई केल्याचे आरोप करणाऱ्या सरनाईकांची शिंदे गटात जाऊनही ईडी संपत्ती जप्त करणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले होते. त्यात प्रताप सरनाईक देखील होते. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. यानंतर सरनाईक काहीसे बाजुला पडले होते. सुरुवातीला शिवसेनेचे नेते त्यांची बाजू मांडत होते, परंतू नंतर फारसे लक्ष दिले जात नसल्याने सरनाईक नाराज असल्याचेही बोलले जात होते. यानंतर शिंदे गटासोबत गेल्याने ईडीची कारवाई थांबली की काय, असा सवाल शिवसेनेतून विचारला जात होता.
आज य़ाबाबत मोठी अप़डेट आली आहे. प्रताप सरनाईकांची संपत्ती जप्त करण्यासाठी ईडीने हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी ईडीने परवानगी मिळविली असून सरनाईकांची पहिल्या टप्प्यात ११ कोटींची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. यामध्ये ठाण्य़ातील दोन फ्लॅट आणि मीरारोडमधील कोट्यवधी किंमतीचा प्लॉट ईडी ताब्यात घेणार आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपीने दिले आहे.