प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:06 PM2019-09-23T19:06:23+5:302019-09-23T19:09:55+5:30

सोलापूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Praniti Shinde's problems increase; A code of conduct will be registered for a violation | प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार

प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार

googlenewsNext
ठळक मुद्दे- आचारसंहिता भंगाचा राज्यातील पहिला गुन्हा- आमदार प्रणिती शिंदेंच्या अडचणीत वाढ- माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केली होती तक्रार

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेकअप बॉक्सचे वाटप केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

याबाबत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी तक्रार दाखल केली होती़ २१ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याचवेळी आचारसंहितेचा अंमल लागू झाल्याचे जाहीर केले होते़ त्यानंतर काँग्रसचे कार्यकर्ते शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विडी घरकूल परिसरात मेकअप बॉक्सचे वाटप केल्याची पुराव्यानिशी तक्रार एका महिलेने माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडे केली होती़ त्यानुसार आडम मास्तर यांनी मेकअप बॉक्ससह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावरून त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा खुलासा घेतला.

त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी गणेशोत्सवात मेकअप बॉक्स वाटप केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे पण विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तक्रार आल्याने याची शहानिशा होण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी सांगितले. याबाबत पोलीस तपास करून पुढील बाबी स्पष्ट करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

Web Title: Praniti Shinde's problems increase; A code of conduct will be registered for a violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.