शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

"छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" संभाजीराजेंनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:35 PM

खासदार संभाजीराजेंनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. "छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" असे उदगार संभाजीराजेंनी काढले.

नवी दिल्ली/कोल्हापूर - देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपचारांनंतर अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. खासदार संभाजीराजेंनीही प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. "छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" असे उदगार संभाजीराजेंनी काढले आहेत.फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहताना संभाजीराजे म्हणाले, देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अत्यंत दुःख वाटत आहे. खासदार म्हणून माझी नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून झाली,त्यावेळी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्यासोबत भेटून चर्चा करण्याची संधी मिळाली.

छत्रपती घरण्याविषयी त्यांच्या मनात अपूर्व आस्था होती, हे मला प्रत्येक वेळी जाणवायचं. त्यांनी माझ्या सामाजिक कार्याविषयी, विशेतः किल्ल्यांविषयी सुरू असलेल्या कामांचे नेहमीच कौतुक केले. अनेक बाबतीत मला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या इतक्या विद्वान व्यक्तीशी माझी ओळख झाली होती हे मी माझे सद्भाग्य समजतो. त्यांच्या जाण्याने आपल्या देशाची न भरून येणारी हानी झाली आहे. आज आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती