शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

प्रकाश मेहतांमुळे सरकारची कोंडी, विरोधक झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ

अतुल कुलकर्णी । 

मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी विधानसभेत जाहीर केले. मात्र, कोणत्या प्रकारची चौकशी समिती नेमली जाणार, त्याची कार्यकक्षा काय असणार, ती चौकशी कोण करणार याविषयी कोणतीही स्पष्ट भूमिका सरकारने जाहीर केली नाही. मेहतांवर कारवाई केली तर एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांच्यावरही कारवाई करावी लागेल आणि कारवाई केली नाही तर विरोधक याचे मोठे भांडवल करतील, या दुविधेत सरकार अडकले आहे.दरम्यान, प्रकाश मेहता यांनी, आपल्याच पक्षातील काही छुप्या हितशत्रूंनी आपल्या बदनामीचे कारस्थान रचल्याचा गंभीर आक्षेप घेतल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. भाजपामध्ये या विषयाची वेगळीच स्टोरी सांगितली जाते. मेहता आणि पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र, मेहता आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत. एस.डी. कॉर्पोरेशनचे काम मार्गी लागावे, यासाठी शहा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारुन निर्णय घ्या, असे मेहतांना सांगितले होते; पण मेहता यांनी तसे न करता ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ असे फाइलवर लिहून स्वत:च निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले अशी माहिती भाजपाचे काही नेते खासगीत सांगतात. अमित शहा यांचे नाव या सगळ्या प्रकारामागे आल्यामुळे आणि हा निर्णय अमलात आला असता, तर होणारा आर्थिक लाभ हा ५०० ते ७०० कोटींचा असल्याचे मांडले गेल्याने या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळेच मेहता यांचे पक्षांतर्गत हितशत्रू कोण? मेहता यांचा रोख कोणाच्या दिशेने आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. विरोधकांनाही या प्रकरणी एवढ्या उशिरा जाग येण्याचे कारण काय? असाही एक सूर यावरील चर्चेत आहे.मेहता यांच्यावतीने एक ई-मेल माध्यमांना खुलासा म्हणून पाठवला गेला. सभागृह चालू असताना मंत्री सभागृहाबाहेर कसे निवेदन देतात, स्वपक्षीयावर गंभीर आक्षेप कसे घेतात, असे प्रश्नमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केल्यानंतर आपण असे निवेदन केलेच नाही, असे घुमजाव मेहता यांनी केले.मात्र, जर मेहता यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हे निवेदन स्वत:च्या सहीने करावे, ते जर हे निवेदन नाकारत असतील तर त्या निवेदनातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती तिसºयाच माणसाला कशी काय मिळते, निवेदनात मेहतांच्या नावापुढे माननीय वगैरे शब्दप्रयोग कसे येतात? हे सगळे संशयास्पद असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दबाव टाकल्यामुळेच मेहता यांनी हे निवेदन मागे घेतले असावे, असे चव्हाण ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.अतिरिक्त मुख्य सचिवांना कळत नाही का?गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी एस.डी. कॉर्पोरेशनबाबत असा निर्णय घेणे अयोग्य असल्याचे पानभर नोटिंग केलेले असताना ते खोटे ठरवून मेहता यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाºयाला काही कळत नाही का? तसे असेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल आणि जर संजयकुमार यांचे बरोबर असेल तर मेहतांवर कारवाई करावीच लागेल.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्रीमेहता यांनी हे प्रकरण अधिवेशनात येऊ नये यासाठी प्रचंड प्रयत्न केले; पण त्यात त्यांना यश आले नाही. त्याच वेळी राधेश्याम मोपलवार यांचे प्रकरण निघाल्याने हे दोन्ही विषय आणखीनच अडचणीचे बनले. मोपलवार यांच्यावर कारवाई केली तर मेहतांवर का नाही, असा सवाल विरोधक करतील त्यामुळे सरकारची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे.