प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 00:41 IST2025-12-26T00:39:56+5:302025-12-26T00:41:00+5:30
Prakash Mahajan News: दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन आता शिंदेसेनेत प्रवेश कऱणार आहेत. प्रकाश महाजन हे शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश कऱणार आहेत.

प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन आता शिंदेसेनेत प्रवेश कऱणार आहेत. प्रकाश महाजन हे शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश कऱणार आहेत.
प्रकाश महाजन यांनी गुरुवारी शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, प्रकाश महाजन हे शुक्रवारी शिंदेसेनेमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, मनसेमध्ये सक्रिय असलेल्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही वाट्याला उपेक्षाच आल्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे महाजन यांनी समाजमाध्यमावर जाहिर केले होते. कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेल्या काही दिवसांपासून मनात येत होती. खरे म्हणजे यापूर्वीच थांबायला पाहिजे होते. कुठल्याही पक्षात राहिलो तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते. केवळ हिंदुत्वाचा विचार जगला पाहिजे यासाठी आपण पक्षात होतो, असे प्रकाश महाजन त्यावेळी म्हणाले होते.