Budget 2020: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 12:46 IST2020-02-02T12:46:04+5:302020-02-02T12:46:27+5:30
उलट लोकांची भीती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे

Budget 2020: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नसून, अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारने काढला नाही. अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र 'बजेट' असावे, मात्र एससी आणि ओबीसीचे एकत्र 'बजेट' सादर करून या समुहाचे हक्क नाकरण्याचे काम करण्यात आले असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
तर या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही. लोकांना अपेक्षा होत्या की अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न होईल. प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसलेले नाही. उलट लोकांची भीती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भीतीमुळे लोकं खरेदी करत नाही आणि त्यामुळे महसूल उत्पन वाढत नसल्याचे आरोप सुद्धा आंबेडकर यांनी केला आहे.