शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:19 IST

Prakash Ambedkar News: एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासारख्या माणसाला खिशात घातले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली पॉवर दाखवून दिली. हीच त्यांची किमया आहे.

Prakash Ambedkar News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याचे दावे केले जात होते. अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. भाजपा आणि शिवेसना शिंदे गटाचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर महापालिका निवडणुका भाजपा आणि शिंदे गटाने महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा केली. यातच आता येत्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असे वाटत असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिले आहे. आगामी राज्यभरातील महापालिका आम्ही वेगळे लढणार असे भाजपा सांगत होती, पण आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. युती करून लढू असे ते आता म्हणत आहेत.  एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातले आहे. ही त्यांची किमया आहे. त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा असं त्यावरून दिसत आहे. एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

शरद पवार हे चाणक्य आहेत

शरद पवार चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला. मला हे आणि असेच दिसत आहे की, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासारख्या माणसाला खिशात घातले आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच खेळ आता सुरू झाला आहे. NDA मध्ये अजून काही होणार का हे पाहू आणि मग कुठे जायचे ते ठरवू, असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.

दरम्यान, युती करूनच महापालिका निवडणुका आम्ही लढणार आहोत. नगरपालिका निवडणुकीत आम्ही युती करून लढलो आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्ही युती करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच संख्या नाही, म्हणून विरोधी पद दिले गेले नाही. भाजपाने औचित्य दाखवायला हवे होत की, सिंगल लार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष द्यायला हवा होता. सगळ्यांनी बसून एक नाव सुचवायला हवे होते पण तसे झाले नाही. दुर्दैवाने त्यांना म्हणजे भाजपाला अस करायचे नव्हते, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde may become CM again in 2 months: Prediction

Web Summary : Prakash Ambedkar predicts Eknath Shinde could become CM again soon, citing his influence with Amit Shah. He believes Shinde demonstrated his power, leading BJP to agree to contest municipal elections jointly. Ambedkar also mentioned a prior meeting between Shinde and Sharad Pawar.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती